आजोबांचे विचार अंमलात आणा; उदयनराजेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

आजोबांचे विचार अंमलात आणा; उदयनराजेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

मराठा आरक्षण : टाइमपास पुरे झाला - उदयनराजे भडकले

‘शिवाजी महाराज राहू दे…आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचा विचार तरी अंमलात आणा’, असा टोला उदयनराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. पुण्यात आज, मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवरही निशाणा साधला आहे. एवढंच नाही तर शिवसेनेचे नाव आता ठाकरे सेना करावे, असा देखील खोचक सल्ला दिला आहे. तसेच त्यांनी ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावर यांनी आपली भूमिका मांडत या पुस्तकाला विरोध देखील दर्शवला आहे.

काय म्हणाले उदयनराजे भोसले

दरम्यान, या पुस्तकाबाबत संताप व्यक्त करत त्यांनी ‘लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का?’, असा प्रश्न पडला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. ‘जाणता राजा फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत. ३५० वर्षांनंतरही शिवाजी महाराजांचे नाव काढले तरी अंगावर शहारा आणि चैतन्य निर्माण होते. आपण त्यांचा विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करू शकतो, अनुकरण करू शकतो. पण, शिवाजी महाराज कोणी होऊ शकत नाही.’ तसेच ‘छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी करण्याइतकी जगात कोणाचीही उंची नाही आहे. तसेच जगातील आदर्श व्यक्ती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघितले जाते’, असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील यावेळी टालो लगावला आहे.


हेही वाचा – लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का? – उदयनराजे भोसले


First Published on: January 14, 2020 3:02 PM
Exit mobile version