udayanraje : या जन्मीचे, याच जन्मी फेडाव लागत, पवारांवर उदयनराजेंची टीका

udayanraje : या जन्मीचे, याच जन्मी फेडाव लागत, पवारांवर उदयनराजेंची टीका

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या प्रकरणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याच्या निमित्ताने उदयनराजे भोसले यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पवारांवर अतिशय बोचऱ्या अशा शब्दात केलेली टीका आहे. याच जन्मी केलेल याच जन्मी फेडाव लागत अशा शब्दात उदयनराजे यांनी संपूर्ण हल्ल्याच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरणात उदयनराजे यांची प्रतिक्रिया विचारली होती. त्यावर बोलताना उदयनराजे म्हणाले की, माझ्याकडून नेमक काय अपेक्षा आहे. मी म्हणायला हव का फार चांगल झाल, व्हायलाच पाहिजे, झालच पाहिजे होते. पण हा फार छोटा विचार आहे. कर्म असत ना ते प्रत्येकाला लागू होते. आपण जे या जन्मी करतो, ते सगळ्यांना लागू होते. आपण या जन्मी करतो, ते या जन्मीच फेडाव लागत अशा शब्दात उदयनराजे यांनी संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

आज दुपारी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या घरावर दगडफेक आणि चप्पलफेक केली होती. त्यानंतर जवळपास १०७ आंदोलकांविरोधात गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणात एसटी संपकरी कर्मचाऱ्यांचे वकील अॅड गुणरत्न सदावर्ते यांची मुंबई पोलिसांनी दीड तास चौकशी केली. त्यानंतर कट रचणे, तसचे शासकीय कामात अडथळा आणणे या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.


 

First Published on: April 8, 2022 10:53 PM
Exit mobile version