उद्धव ठाकरे पुन्हा सक्रिय; पुढील 15 दिवसात घेणार राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका

उद्धव ठाकरे पुन्हा सक्रिय; पुढील 15 दिवसात घेणार राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका

राज्यात सत्तांतर झाले आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले. त्या नंतर एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार हातात घेतला दरम्यान या सगळ्या घटना घडल्या नंतर उद्धव ठाकरे मात्र अधिक सक्रिय झाले आहेत. दिवाळी नंतर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा ऍक्शन मोड मध्ये येणार आहेत. 31 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या 15 दिवसांमध्ये उद्धव ठाकरे संपूर्ण राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. या सर्व बैठका उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी होणार आहेत.

दरम्यान 2019 लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने राज्यात ज्या लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती त्या मतदार संघातील प्रामुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित असणार आहेत.

उद्धव ठाकरे या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. यावरूनच उद्धव ठाकरे 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच करत आहेत अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना फुटून शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे दोन गट तयार झाले. सद्यस्थितीत शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे 6 खासदार आहेत तर शिंदे गटाकडे 6 खासदार आहेत. दरम्यान शिंदे गटातील 12 खासदारांच्या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका मातोश्रीवर होणार आहेत.

जून महिन्यात झालेल्या विधानपरिषद निवडणुकांनंतर शिवसेनेमध्ये बंडाळी झाली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 55 पैकी 40 आमदारांना वेगळे करत भाजपशी हातमिळवणी केली. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले आणि महाविकासआघाडीचे सरकार कोसळले दरम्यान आमदारांपाठोपाठ शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी 12 खासदारांनीही शिंदे गटात प्रवेश केला.


हे ही वाचा –  दहशतवाद कमी करायचा असेल तर त्यांचा वित्तपुरवठा थांबविणे गरजेचे – परराष्ट्रमंत्री एस जयशंकर

First Published on: October 28, 2022 8:19 PM
Exit mobile version