महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न होतोय, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न होतोय, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

महाविकास आघाडीचं चांगलं चाललेलं सरकार गद्दारी आणि कटकारस्थान करून पाडल्यानंतर हे सरकार कायदेशीर की बेकायदेशीर याचा निकाल लागायचा आहे. महाराष्ट्राची सातत्याने होणारी अवहेलना, अपमान आणि महाराष्ट्रात फुटीरतेची बीजं टाकण्यात येत आहेत. काही गाव कर्नाटकात, तेलंगणा आणि गुजरातमध्ये जायचं आहे असे म्हणत आहेत. हे आजपर्यंत कधी घडलेलं नव्हतं. शिव छत्रपतींचा एकसंघ महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न हेतूपुरस्सर होतोय, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत भाजप, राज्य सरकार आणि राज्यपालांवर निशाणा साधला आहे. हे कटकारस्थान कोण करतंय हे सांगण्याची गरज नाही. कर्नाटक सरकार अगदी आक्रमकतेने आपल्या गावांवरती हक्क सांगत आहे. मी बुलढाण्यातील सभेत सुद्धा बोललो होतो. अक्कलकोट, सोलापूर आणि मग पंढरपूरच्या विठोबावर सुद्धा ते हक्क सांगतील. त्यामुळे आपल्या राज्यात सरकार आहे का नाही? हा प्रश्न निर्माण झाला आहे, उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्यपाल कोणीही येतात आणि कुठूनही कोणालाही पाठवलं जात आहे. केवळ राज्यपाल असल्यामुळे त्यांचा मान-सन्मान राखावा लागतोय. परंतु हेच राज्यपाल छत्रपतींचा अपमान करत आहेत. ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करत आहेत. नवीन आदर्श निर्माण करताहेत. महाराष्ट्रात हिंदुंमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला.

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यामध्ये आज महाविकास आघाडीतील त्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे बडे नेते अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ शासकीय निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, अंबादास दानवे, सुभाष देसाई, विनायक राऊत, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, भाई जगताप, अशोक चव्हाण असे महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते.


हेही वाचा : गुजरातमध्ये मोदींचाच बोलबाला, एक्झिट पोलमधून पुन्हा भाजपला सत्ता


 

First Published on: December 5, 2022 8:03 PM
Exit mobile version