दिवाळी सण सर्वांच्या आयुष्यात चैतन्यदायी पर्व घेऊन येवो, मु्ख्यमंत्र्यांकडून दिवाळीच्या शुभेच्छा

दिवाळी सण सर्वांच्या आयुष्यात चैतन्यदायी पर्व घेऊन येवो, मु्ख्यमंत्र्यांकडून दिवाळीच्या शुभेच्छा

Dr. Deepak Sawant written Uddhav Thackeray The Tiger book Publication by Subhash Desai

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दीपोत्सव, प्रकाश पर्व मंगलमय अशा दिवाळीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. तेजोमय असा हा उत्सव आपल्या सर्वांच्या जीवनात आरोग्य आणि सुख, समृद्धी, संपन्नता घेऊन येवो अशी शुभकामनाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील राज्यातील जनतेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करुन दिवाळी सण साजरा करण्याचे आवाहन केलं आहे. तसेच नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, दिवाळी सण सर्वांच्या आयुष्यात प्रकाश, तेज आणि चैतन्यदायी असे पर्व घेऊन येतो. हा उत्सव अंधाराला भेदून प्रकाशमान वाटा शोधण्याची प्रेरणा देतो. आपल्या सगळ्यांसमोर आरोग्याचे संकट उभे राहिले. या अंधाराला भेदून पुढे जाताना आपल्याला अस्वच्छता, प्रदूषण टाळण्याची आणि आरोग्यदायी सवयी, पर्यावरणाची काळजी घेण्याची प्रेरणा मिळाली आहे. या सकारात्मक गोष्टी आता आपल्याला आयुष्यभर जपाव्या लागतील. त्यांचा वसा पुढच्या पिढीला द्यावा लागेल. प्रकाशपर्वात प्रत्येक पणती तिमिराला भेदण्याची जबाबदारी घेते. त्याचप्रमाणे आपण सर्व कटिबद्ध होऊया. आरोग्यदायी गोष्टींसाठी पुढाकार घेऊया ज्यातून आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि संपन्नता येईल. त्यासाठी या तेजोमय, मंगलमय, प्रकाशपर्वाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातील जनतेला ‘दिवाळी’च्या मनःपूर्वक शुभेच्छा! यंदाची दिवाळी सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, समाधान, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो! ही दिवाळी कोरोना व प्रदुषण प्रतिबंधक नियमांचं पालन करुन आरोग्यदायी साजरी करुया. यंदाची दिवाळी राज्याला कोरोनामुक्तीकडे नेणारी ठरो अशी प्रार्थना अजित पवार यांनी केली आहे.

शरद पवारांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा 

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवार यांनी म्हटलं आहे की, यंदाच्या दीपावलीत आपले जीवन सकारात्मकतेच्या प्रकाशाने उजळून निघावे, नवी स्वप्ने, नवी उमेद, नव क्षितीजे गाठण्याच्या आपल्या ध्येयासक्त प्रयत्नांना दिव्य यशाची झळाळी प्राप्त व्हावी ही मनोकामना. दीपावलीच्या आनंदमयी, तेजोमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनपूर्वक शुभेच्छा असे ट्विट शरद पवार यांनी केलं आहे.


First Published on: November 4, 2021 4:51 PM
Exit mobile version