बाबरी मशीद पडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते?, मनसे-भाजपवर तुटून पडा, उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश

बाबरी मशीद पडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते?, मनसे-भाजपवर तुटून पडा, उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश

भाजपवर तुटून पडा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. शुक्रवारी वर्षावर शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देखील हल्लाबोल केला. बाबरी मशीद पडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

राज्यात गेले काही दिवस हिंदुत्वावरुन भाजप आणि मनसे शिवसेनेवर सातत्याने टीका करत आहेत. यावरुन उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत मनसे आणि भाजपचं हिंदुत्व किती बोगस आहे हे जनतेला दाखवून द्या, भाजपच्या आरोपांना सडेतोड उत्तर द्या. याबरोबरच भाजपवर तुटून पडा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. तसेच, बाबरी मशीद पडली त्यावेळी राज ठाकरे कुठे होते? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.

शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान सुरु होत आहे. १४ मे रोजी उद्धव ठाकरे यांची बीकेसीमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेनंतर शिवसंपर्क अभियानाला सुरुवात होणार आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते, उपनेते, खासदार आणि प्रवक्त्यांशी चर्चा केली. या बैठकीला संजय राऊत, अरविंद सावंत, नीलम गोऱ्हे, प्रियंका चतुर्वेदी, सचिन अहिर, सुनील प्रभु, किशोरी पेडणेकर,शितल म्हात्रे, शुभा राऊळ, किशोर कान्हेरे, संजना घाडी, आनंदराव दुबे, किशोर तिवारी, विनायक राऊत, ओमराजे निंबाळकर, अनिल देसाई, हेमंत पाटील, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, संजय मांडलिक, भावना गवळी, श्रीकांत शिंदे आदी नेते, उपनेते, खासदार आणि प्रवक्ते उपस्थित होते.

 

First Published on: April 29, 2022 8:32 PM
Exit mobile version