उद्धव ठाकरेंनी बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्त्व करावे : संजय राऊत

उद्धव ठाकरेंनी बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्त्व करावे : संजय राऊत

उद्धव ठाकरे कधीही आडपदडा ठेवून बोलत नाहीत. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लढायला हवे, हीच भूमिका त्यांनी मांडली. बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व आता उद्धव ठाकरे यांनी करायला हवे, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. भाजप खासदार नारायण राणे यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना, महाराष्ट्र, सांभाळता येत नाही, आणि चालले देशातील दुसरी राज्य सांभाळायला! असा टोला लगावला आहे.

संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता म्हणून जबरदस्त काम करत आहेत. देशाच्या इतिहासात त्यांचे नाव घेतले जाईल. काँग्रेसमध्ये जे काय घडले, त्यावर काँग्रेसने बोलले पाहिजे. काँग्रेस हा देशाला माहीत असलेला मोठा पक्ष आहे, विरोधी पक्ष आहे. देशाला मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे. पृथ्वीराज चव्हाण हे मोठे नेते आहेत. संपूर्ण देशात ज्यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते काम करतील ते राहुल गांधीच आहेत. ते सक्षम आहेत. काँग्रेसने या वादळातून सावरावं आणि जमिनीवर काम करावं, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.


महाराष्ट्र सांभाळता येत नाही आणि चालले देशातील दुसरी राज्य सांभाळायला.
-नारायण राणे, खासदार, भाजप.

First Published on: August 27, 2020 10:37 PM
Exit mobile version