राहुलजी ‘गरिबी हटाव’ची सुरुवात तुमच्या आजीपासून झाली – उद्धव ठाकरे

राहुलजी ‘गरिबी हटाव’ची सुरुवात तुमच्या आजीपासून झाली – उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जनतेला आवाहन

‘राहुलजी गरिबी हटावची सुरुवात तुमच्या आजीपासून झाली आहे. तुमची गरिबी हटली मात्र लोकांची गरिबी तशीच आहे. लोकांची गरिबी हटवण्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा आमच सरकार आणायचं आहे’, असे म्हणत पुन्हा एकदा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल यांच्यावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला आहे. ‘आम्ही जो जाहीनामा प्रसिद्ध केला त्या जाहीरनाम्यात महत्त्वाचे मुद्दे घेण्यात आले असून शेतकऱ्यांचा मुद्दा हा या जाहीरनाम्याचा मुख्य केंद्रबिंदू आहे. मात्र आम्ही प्रसिद्ध केलेला जाहीरनामा गेल्या वेळचाच असल्याची कॉंग्रेसकडून टीका करण्यात आली आहे. मात्र नशीब तुम्हाला वाचता तरी येत. मात्र तुमच्या जाहीरनाम्यात वचन नाही तर थाबा आहेत’, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेसवर घणाघात केला आहे. आज पहिल्यांदा लातूरमधील औसा येथे जाहीर प्रचारसभेत शिवसेना-भाजपच्या युतीनंतर उद्धव-मोदी एकाच व्यासपीठावर असताना उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लक्ष केले.

आधीच सरकार दहशतवाद्यांसमोर मान झुकवणार होत

‘पी. व्ही. नरसिंहराव यांच्या वेळची एक आठवण सांगतो की, त्यावेळच सरकार जे सरकार होते ते दहशतवाद्यांसमोर मान झुकवणार होत. पण आजच सरकार हे पाकिस्तानाला ठोकणार सरकार आहे. पाकिस्तानानी कितीही कुरापती केल्या तरी फक्त बोलत नाही की ठोकणार, तर ठोकून दाखवत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे. पाकिस्तानावर एकच घाव घाला की, पाकिस्तानचा नामोनिशाण राहता कामा नये. ही आपल्या देशवासियांची इच्छा’, असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

‘मोदी’च पंतप्रधान होणार

‘निवडणूक ही महिलांची, शेतकऱ्यांची, तरुणांची आणि देशाची आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच पंतप्रधान बनवा. ज्या ठिकाणी शिवसेनेचा धनुष्यबाण असले तिथे धनुष्यबाणावर क्लिक करा आणि ज्या ठिकाणी कमळ आहे त्याठिकाणी कमळवर क्लिक करा. तिसऱ्या बटनाकडे पाहू देखील नका’, असे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी यावेळी केले आहे.

First Published on: April 9, 2019 12:23 PM
Exit mobile version