उद्धव ठाकरे आज संभाजीनगर दौऱ्यावर, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेटणार

उद्धव ठाकरे आज संभाजीनगर दौऱ्यावर, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेटणार

मुंबई – शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी संभाजीनगरचा दौरा करणार आहेत. मराठवाड्यात गेल्या २५ दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेलेल पीक परतीच्या पावसामुळे पूर्ण भिजून वाहून गेले. अनेक शेतकऱ्यांची शेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. तरीही राज्यकर्ते सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता नाही, अशी जाहीर विधाने करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत.

शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या आढावा घेऊन त्यांना तातडीने मदत कशी करता येईल याची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे रविवारी संभाजीनगरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना शासकीय मदत लगेच कशी मिळवून देता येईल यासाठी ते शिवसेनेची यंत्रणा कार्यान्वित करणार असल्याचीही माहिती आहे.

असा असेल उद्धव ठाकरेंचा दौरा….

First Published on: October 23, 2022 8:07 AM
Exit mobile version