उद्धव ठाकरे लवकरच ट्विटवर

उद्धव ठाकरे लवकरच ट्विटवर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जनतेला आवाहन

देशासह जगभरात सध्या ट्विटवरसारख्या सोशल नेटवर्किंग साईटची जादू पसरली आहे. आपल्या प्रश्नांना हक्कांचे व्यासपीठ मिळवून देण्याबरोबरच आपले मत संबंधितांपर्यंत पोहचविण्याची माध्यम म्हणून ज्या माध्यमाकडे पाहिले जाते. अशा या ट्विटरवर आता लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आगमन होणार असल्याची माहिती हाती आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ट्विटर अधिकृत खाते उघडले जाणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कार्यालय असे या खात्याचे नाव असण्याची शक्यता आहे.

ट्विवरकडून या खात्याला अधिकृत दर्जा मिळाल्यानंतरच हे खाते सर्वांसाठी खुले केले जाणार असल्याची माहिती, अशी माहिती शिवसेनेतील सूत्रांकडून देण्यात आलेली आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ट्विटवर येणार असल्याची चर्चा सुरु झाली असून लोकांशी थेट संवाद साधता यावा, यासाठी हे पाऊल उचलले जाणार आहेत. त्याशिवाय उद्धव ठाकरे यांची भाषणे सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी हे ट्विटरचे पाऊल उचलण्यात आले आहे.

मुंबईसह देशभरात सध्या फेसबुक आणि ट्विटरची चलती आहे. युवा वर्गांपासून ते वयोवृध्दापर्यंत अनेकजण आपले मत मांडण्यासाठी ट्विटरचा वापर करतात. राजकारणीही त्यात मागे नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदीपासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत अनेकजण ट्विटरवर आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी गेल्यावर्षी ट्विटवर खाते सुरु केले. तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी २०१९मध्ये बसपाच्या अध्यक्षा मायवती यांनी हिंदीमधून ट्विटरवर संवाद साधला होता.

तर काही महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या सचिव प्रियांका गांधी यांनी देखील ट्विटरवर दाखल होत कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील ट्विटरवर नेहमीच अ‍ॅक्टिव असतात. त्यांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता आता शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांचे अधिकृत खाते सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. लवकरच हे अधिकृत खाते सुरु केले जाणार असून त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसांपासून सुरुवात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर अनेकांना त्यांच्या अधिकृत खात्याचे नाव काय असणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

सध्या राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून वाढत असलेला सोशल नेटवर्किंग साईटचा वापर लक्षात घेता तज्ज्ञांकडून त्याचे स्वागत करण्यात आले आहे. याबद्दल बोलताना मुंबई विद्यापीठाच्या कॅम्युनिकेशन अ‍ॅण्ड जर्नलिझिम विभागाचे प्रमुख डॉ.संजय रानडे सांगतात की, सोशल मिडीया हे सध्या प्रभावी माध्यम मानले जाते. जास्तीत जास्त लोकांपर्यंत या माध्यमातून पोहचता येते. ग्राफिक, फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ते जास्तीत जास्त आर्कषक पध्दतीने लोकांपर्यंत मांडता येते. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधणे अधिक सोप्पं झाल्याने आता ट्विटरचा वापर वाढला असल्याचे मत यानिमित्ताने व्यक्त केले जात आहे.

First Published on: July 1, 2019 4:22 AM
Exit mobile version