पुण्यात आपच्या कार्यकर्त्यांनी अडवला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा ताफा

पुण्यात आपच्या कार्यकर्त्यांनी अडवला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा ताफा

पुणे – आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज वारजे येथे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या गाडीचा ताफा अडवला. यात आपचे वारजे माळवाडी भागातील कार्यकर्ते निलेश वांजळे यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते. महागाई, जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी, जनविरोधी आर्थिक धोरणांचा निषेध यावेळी करण्यात आला. दरम्यान ऑपरेशन लोटस विरोधात घोषणा देण्यात आल्या. यानंतर आपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

बारामती पाहण्यासाठी 3 दिवस पुरणार नाहीत –

बारामती दौऱ्यावर अर्थमंत्री निर्मला सीतारमन आल्या आहेत. यावर सीताराम बारामती आल्यानंतर बारामतीमध्ये अनेक संस्था आहेत, ज्या त्यांनी पाहाव्यात. त्यासाठी माझी ही त्यांना विनंती असेल की, कृषी विज्ञान केंद्र आणि इतर संस्था पाहव्यात यासाठी त्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. जर सीतारामन यांना वेळ असेल तर मी स्वतः फिरून त्यांना बारामती दाखवेन, असे प्रतिआव्हान सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पुढे त्यांनी या भागाची काही माहिती पाहिजे असेल तर ती आम्ही द्यायला तयार आहोत. बारामती हे मॉडेल आहे. भाजपचे अनेक नेते या ठिकाणी फिरून गेले आहेत, बारामतीचा विकास पाहण्यासाठी त्यांना 3 दिवस पुरणार नाहीत, अशी टीकी सुळे यांनी केली.

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या बारामती दौऱ्यावर शरद पवार काय म्हणाले –
२०२४ लोकसभा निवडणुकीत बारामतीतून भाजपचा खासदार निवडून येईल, यासाठी दिल्लीवरून नियोजन सुरु आहे. याबाबत आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर निर्मला सीतारमन यांची भाषा बारामतीकरांना सहज समजेल, असे शरद पवारांनी म्हटले आहे.
First Published on: September 22, 2022 6:51 PM
Exit mobile version