भाजपच्या कर्नाटक पराभवावरून राज ठाकरे आणि नारायण राणेंमध्ये खडाजंगी; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

भाजपच्या कर्नाटक पराभवावरून राज ठाकरे आणि नारायण राणेंमध्ये खडाजंगी; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

मुंबई | “राज ठाकरेंचे किती आमदार आणि खासदार आहेत. हे पाहावे आणि यानंतरच त्यांनी बोलावे”, असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी लगावला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Result 2023 ) भाजपला (BJP) पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजपवर टीका केली होती. यामुळे भाजप आणि राज ठाकरे असा सामना रंगलेला आपण पाहिला आहे. राज ठाकरेंच्या टीकेला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि  नारायण राणेंही जोरदार टीका केली आहे.

नारायण राणेंच्या टीकेला राज ठाकरेंनी पलटवार करत म्हणाले, “कर्नाटक निवडणुकीतील भाजपचा पराभव हा त्यांच्या स्वभावाचा आणि वागणुकीचा असलेला निकाल आहे. कर्नाटकातील विजय हा राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम दिसून आला आहे. भाजपच्या राज्यातील नेत्यांना कोणी विचारत नाही, यात फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांचे अस्तित्व आहे”, अशी टीका त्यांनी केली.

नारायण राणे म्हणाले, “राज ठाकरेंचे एकूण किती आमदार आणि खासदार आहेत, अशा व्यक्तींनी महाराष्ट्राबद्दल भाष्य करू नये. देशात आमचे ३०२ खासदार आहेत तर महाराष्ट्रात १०५ आमदार आहेत. आणि राज ठाकरेंच्या एकलव्याने लोकप्रियतेची भाषा करावी आणि तुम्ही दाखवावे हे नेमके कोणाचे दुर्दैवे?”, असा सवाल करत त्यांनी राज ठाकरेवर टीका केली.

पंतप्रधान मोदी यांच्या योजनेतून रोजगार मेळाव्याचा पाचवा टप्पा होता. या टप्प्यात ७१ हजार युवकांना नोकऱ्या मिळणार असून यानिमित्ताने नारायण राणे आण पुण्याचा सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये आले होते. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना नारायण राणेंना राज ठाकरेंनी कर्नाटक निकालावरून भाजपवर टीका केली यासंदर्भात प्रश्न विचारल्यावर त्यांनी पलटवार केला.

हेही वाचा – “सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरे, संजय राऊत नैराश्यात”, नारायण राणेंची टीका

संजय राऊत, उद्धव ठाकरे हे सध्या नैराश्यात  

एकनाथ शिंदेचा पोपट मेलेला आहे, असे संजय राऊत म्हणाले, पत्रकारांनी नारायण राणेंना विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, “संजय राऊतांकडे सध्या काम नाही. संजय राऊतांची संपादक म्हणून ही भाषा योग्य वाटते का?, असा उलट सवालही त्यांनी माध्यमांना केला. नारायण राणे पुढे म्हणाले, “पोपट जेव्हा शिवसेनेत होता, तेव्हा तो भरारी घेत होता. मातोश्रीत येत होता, तेव्हा तो चांगला वाटत होता. आता पोपट मेला?, महाराष्ट्रच्या मुख्यमंत्री पदी कोणीही असो, मुख्यमंत्री हे मोठे पद आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांबद्दल कोणी अपशब्दाने बोलू नये. संजय राऊतसारख्या संपादकाने अशी भाषा वापरणे योग्य नाही. यामुळे संजय राऊत, उद्धव ठाकरे हे सध्या नैराश्यात आहेत. सत्ता गेल्यामुळे ते वेड्यासारखे बडबड करत आहेत. हो दोघेही चांगले बोलू शकत नाहीत.

 

First Published on: May 16, 2023 7:00 PM
Exit mobile version