युपीत महाराष्ट्र भवन उभारणार; मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीत योगींचा होकार

युपीत महाराष्ट्र भवन उभारणार; मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीत योगींचा होकार

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईत दाखल झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. विशेष म्हणजे या भेटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर प्रदेशात महाराष्ट्र भवन उभारण्याची मागणी केली होती. त्या मागणीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी होकार दिल्याची माहिती शिंदेंनी दिली. (Up Cm Yogi Adityanath accept permission of maharashtra bhawan in up says cm eknath shinde)

उत्तर प्रदेशातील अयोध्येत लवकरच महाराष्ट्र भवन बांधले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका उत्तर भारतीय कार्यक्रमात याआधी केली होती. त्यानंतर आता युपीचे योगी मुंबई दौऱ्यावर असताना एकनाथ शिंदे यांनी युपीतील महाराष्ट्र भवनाबाबत विचारणा केली. त्यावेळी योगींनी या मागणीला त्यांनी तत्वतः मंजुरी दिल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच, लवकरच आपण प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन घेण्यासाठी अयोध्या दौऱ्यावर येणार असल्याचेही यावेळी त्यांना सांगितले.

मुंबई दौऱ्यावर आलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक व गोरखपूरचे खासदार रवि किशन देखील उपस्थित होते. राज्यपालांनी योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट दिली.

नोएडा येथे आगामी फिल्म सिटीच्या संदर्भात देशातील आघाडीचे टायकून आणि बँकर्स तसेच प्रमुख चित्रपट व्यक्तिमत्त्वांची भेट घेतील. संभाव्य गुंतवणूकदारांना उपलब्ध संधी आणि उत्तर प्रदेशातील अनुकूल व्यावसायिक वातावरणाची ओळख करून देण्यासाठी देशातील नऊ शहरांमध्ये रोड शो आयोजित केले जातील. रोड शो आणि शीर्ष उद्योगपती आणि बँकर्स यांच्या भेटीपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्याशी शिष्टाचार भेट घेतील.

उच्चर प्रदेशला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी आणि परदेशी गुंतवणूकदारांना ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट (जीआयएस २०२३) मध्ये आमंत्रित करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जबाबदारी स्वीकारली आहे.


हेही वाचा – युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आज मुंबईत रोड शो, उद्योग क्षेत्रातील दिग्गजांची घेणार भेट

First Published on: January 5, 2023 9:13 AM
Exit mobile version