उर्मिला म्हणते ‘तुमको मिर्ची लगीं तो मैं क्या करूँ!;

उर्मिला म्हणते ‘तुमको मिर्ची लगीं तो मैं क्या करूँ!;

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर

बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र, तिच्या प्रवेशानंतर सर्वच स्तारातून तिच्यावर टीका केली जात आहे. उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना केलेली वक्तव्ये, लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेनेच्या मुंबई पालिकेतील कारभारावर केलेली टीका, असे एक ना अनेक व्हिडिओ आणि फोटो विरोधकांकडून व्हायरल केले जात आहेत. यावर उर्मिला मातोंडकरनी देखील शिवसेनेच्या स्टाइलमध्येच प्रत्युत्तर देत म्हणाली आहे की, ‘तुमको मिर्ची लगीं तो मैं क्या करूँ’, असे ट्विट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

उर्मिला मातोंडकर झाल्या आक्रमक

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवसैनिक कार्यकर्त्यांप्रमाणे चांगलीच आक्रमक झाली आहे. तिने कामाचा देखील चांगलाच धडाका लावला असून शिवसेना स्टाइलने ती विरोधकांना प्रत्युत्तर देत आहे. दरम्यान, भाजपाचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ते म्हणतात की, ‘उर्मिला यांना पक्षात घेऊन शिवसेनेने पक्षातील लढवय्या महिला कार्यकर्त्यांचंच अवमूल्यन केलं आहे,’ अशी तोफ दरेकर यांनी डागली आहे.

काय म्हणाली उर्मिला

उर्मिला हिने अगदी मोजक्या शब्दात झणझणीत ट्विट केले आहे. ‘तुमको मिर्ची लगीं तो मैं क्या करूँ’, हे गाणे मला खूप आवडते. तुम्हाला काय वाटते?’, असे ट्विट करत उर्मिला यांनी विरोधक आणि ट्रोलर्सना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

उर्मिलाने साधला कंगनावर निशाणा

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणानंतर कंगनाने सरकारवर अनेक आरोप केले. तसेच कंगना प्रकरणावरून राजकिय वर्तुळात अनेक घडामोडी घडल्या. दरम्यान, कंगनाने मुंबईची पाकिस्तानसोबत केलेल्या तुलनेमुळे मुंबईकारांची मने दुखावली गेली. याबाबत अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या शिवसेना पक्षप्रवेशानंतर उर्मिलाला कंगनाविषयी प्रश्न विचारण्यात आले. यावर कंगाला अनावश्यक महत्त्व दिले आहे, असे उर्मिलाने म्हणत कंगनाला चांगलाच टोला लगावला आहे.


हेही वाचा – नाशकात एकाच दिवशी दोन तरुणींसह युवकाची आत्महत्या


First Published on: December 3, 2020 6:27 PM
Exit mobile version