राज्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ; पहिल्या दिवशी २८,५०० कोरोनायोद्ध्यांना लस

राज्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ; पहिल्या दिवशी २८,५०० कोरोनायोद्ध्यांना लस

लसीकरण

देशासह राज्यात आजपासून (शनिवार) लसीकरणाला सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राज्यातील लसीकरणाला सुरुवात होणार आहे. सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड लस पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना दिली जाणार आहे. राज्यात पहिल्या दिवशी २८ हजार ५०० कोरोनायोद्ध्यांना लस दिली जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर १०० प्रमाणे सुमारे २८ हजार ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे नियोजन करण्यात आलं आहे. ज्यांना लस देण्यात येणार आहे त्यांना आज सायंकाळपर्यत मेसेज पाठविण्याचं काम सुरू होतं. त्यामुळे आत सर्वांची नजर ही लसीकरण मोहीमेवर असणार आहे.

राज्यात आजपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरु होत आहे. राज्यातील लसीकरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सकाळी ११.३०30 वा. मुंबई महापालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील जंबो कोविड केअर सेंटरमध्ये होणार आहे. तर देशव्यापी लसीकरण मोहिमेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सकाळी १०.३० वा. होणार आहे. पंतप्रधान मोदी विलेपार्लेतील डॉ. आर. एन. कुपर रुग्णालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरण मोहिमेचं उद्घाटन करणार आहेत.

राज्याची लसीकरणाची तयारी कशी आहे?

राज्यात शनिवारी २८५ केंद्रांवर करोना लसीकरण मोहीम सुरू होणार असून पहिल्या दिवशी २८ हजार ५०० कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. लसीकरण मोहिमेचा प्रारंभ जालना जिल्हा रुग्णालय आणि मुंबईत कूपर रुग्णालयात शनिवारी सकाळी साडे दहा वाजता होईल. त्यानंतर राज्यातील २५८ केंद्रांवर लसीकरणास सुरुवात होईल. दररोज सकाळी नऊ ते पाच या वेळेत लसीकरण केले जाईल, असं आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितलं.

मुंबईत लसीकरण मोहीमेची तयारी

मुंबईत लसीकरणासाठी एकूण ९ केंद्र तयार करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेला पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून ‘कोविशील्ड’ या लसीचे सुमारे १ लाख ३९ हजार ५०० डोस उपलब्ध झाले आहेत. महानगरपालिकेकडे १ लाख ३० हजार लसींची लसीकरणासाठी नोंदणी झाली आहे. या मोहिमेसाठी ७ हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे.


हेही वाचा – मुंबईत आज कोरोना लसीकरणाचा तिसरा ड्राय रन


 

First Published on: January 16, 2021 8:16 AM
Exit mobile version