वैष्णवी चौधरीने सर केल हिमालयातील काब्रू डोम शिखर; पहिली एनसीसी कॅडेट

वैष्णवी चौधरीने सर केल हिमालयातील काब्रू डोम शिखर; पहिली एनसीसी कॅडेट

नाशिक : हिमालय पर्वत रागांमध्ये असलेल्या काब्रू डोम शिखर सर करणारी केटीएचएम महाविद्यालयातील वैष्णवी चौधरी ही पहिलीच एनसीसीची विद्यार्थिनी ठरली आहे. 17 हजार 500 फूट उंचीवर असलेल्या या शिखरावर तिने नाशिकचा झेंडा रोवला आहे. हिमालय पर्वतारोहण संस्थेतर्फे दार्जिलिंग येथे 28 दिवसांच्या प्रशिक्षणासाठी वैष्णवीची निवड झाली. जूनमध्ये पहलगाम येथे झालेल्या प्राथमिक पर्वतारोहण शिबिरामध्ये ‘अ श्रेणी’ मिळाल्यामुळे अ‍ॅडव्हान्स पर्वतारोहण शिबिरासाठी तिची निवड झाली.

शारीरिक चाचणीनंतर त्यांना आपत्कालीन परिस्थितीत कृत्रिम स्ट्रेचर कसा बनवायचा हे शिकवण्यात आले. सात दिवसांच्या अखंड प्रशिक्षणानंतर कॅडेटला ग्लेशियरमध्ये हलवण्यात आले आणि हिमनदीचे नाव राथोंग ग्लेशियर होते. राथोंग ग्लेशियरला जाण्यासाठी त्यांना 24 किलो मीटर गोचाला ट्रेकिंग मार्ग पार करावा लागतो. हा आशियातील तीसरा सर्वात कठीण ट्रेक आहे. ती यशस्वीपणे ट्रेक पूर्ण करून बेस कॅम्पवर पोहोचली. तेथे तिने सात दिवसांचे हिमनदीचे प्रशिक्षण घेतले आणि शेवटचा दिवस सबमिट करण्याचा दिवस होता. उत्तर सिक्कीममध्ये आणि समुद्र सपाटीपासून 17 हजार 500 फूट उंचीवर असलेल्या काब्रू डोम नावाचे व्हर्जिन शिखर पार केले. हिमालय पर्वतारोहण संस्था ही पर्वतारोहण शिबीरासाठी सर्वात जुनी आणि सर्वोत्तम संस्था आहे. दरवर्षी सुमारे 12 हजार प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले जाते.

यामध्ये मार्कोस (नेव्ही) पॅरा कॅमांडो, एनसीसी मुले आणि मुली आणि नागरिक यांचा समावेश आहे. या कोर्समध्ये एकूण 59 जणांची संख्या होती. त्यापैकी ती एकमेव मुलगी एनसीसी कॅडेट होती जिने काब्रू डोम शिखर यशस्वीरित्या सर केले.वैष्णवीला मुंबई बी ग्रुपचे कमांडर कॅप्टन निलेश देखने, कर्नल समीरसिंग राणावत, कॅप्टन शैला मेंगाणे व तिचे पालक सार्जंट अनिल चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

First Published on: October 25, 2022 3:43 PM
Exit mobile version