ग्रामीण भागात ५ वी ते ७ वी तर शहरी भागात ८ वी ते १२ वी वर्ग सुरु, शिक्षणमंत्र्यांची माहिती

ग्रामीण भागात ५ वी ते ७ वी तर शहरी भागात ८ वी ते १२ वी वर्ग सुरु, शिक्षणमंत्र्यांची माहिती

शाळा सुरु करण्यासंदर्भात परिपत्रक काढले आहे. यामध्ये इयत्ता ५ वी ते ७ वी ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील ८ वी ते १२ वीच्या शाळा सुरु करण्यासंदर्भात मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत. यापुर्वी शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ८ वी ते १२ वीच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. आता शहरी भागातील शाळा सुरु करण्याबाबत परिपत्रक काढले आहे. या शाळा सुरु करत असताना मोठ्या संख्येने कोणत्या भागात रुग्णा संख्या असेल तसेच रेड झोन असेल अशा ठिकाणी शाळा सुरु करु नये असे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन त्या ठिकाणी शाळा सुरु करण्यात येणार आहेत.

राज्यात ज्या ठिकाणी शहरी भागात रुग्ण संख्या कमी आहे. निर्बंध शिथिल करण्यात आलेल्या भागात पहिल्यांदा मोठ्या मुलांना बोलवण्यात यावे असे निर्देश दिले आहेत. तसेच शिक्षकांचे पुर्ण लसीकरण करण्यावर भर द्यावा, मुलांना शाळेत बोलवल्यावर कोरोना नियमांचे पालन करण्यात यावे यावर देखील भर देण्यात आला आहे. ग्रामीण भागात कमिटी केली असून जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत राहिल. तसेच शहरी भागात आयुक्तांच्या अंतर्गत कमिटी तयार करण्यात आली असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

मुंबई, ठाण्यातील निर्णय पालिका आयुक्त घेतील

मुंबई, ठाणे, उपनगर या शहरातील कोविड परिस्थितीनुसार शाळा सुरु करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त घेतील असे नियमावलीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी निर्णय घेणार

राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर जिल्हातील कोविड परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतील.

नियमावलीमध्ये काय म्हटलंय

नगपंचायत, नगरपालिका, ग्रामपंचायत स्तरावर निर्णयासाठी चार सदस्यीय समिती निर्णय घेणार, या समितीचे प्रमुख हे जिल्हाधिकारी असतील
शाळा सुरु करण्यापुर्वी कमीतकमी एक महिना शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असावा
शिक्षकांचे लसीकरण होण आवश्यक
गर्दी टाळण्यासाठी पालकांना प्रवेश टाळा
जास्त विद्यार्थ्यांची संख्या असलेल्या शाळा दोन सत्रांत घ्या
दोन बाकांमधील अंतर ६ फुटांचे तर १५ ते २० विद्यार्थी एका वर्गात असावेत.
कोरोना नियमांचे पालन करणं आवश्यक, मास्क, सोशल डिस्टन्सिगचे पालन करावं

First Published on: August 10, 2021 6:51 PM
Exit mobile version