भाजीपाल्याचे दर कडाडले; आवक घटल्याने भाव शंभरीपार

भाजीपाल्याचे दर कडाडले; आवक घटल्याने भाव शंभरीपार

नाशिक : जिल्हयात झालेल्या अतिवृष्टीमुळे भाजीपाला खराब झाला असून यामुळे शेतमालाची आवक घटली आहे. परिणाम भाज्यांचे दर गगनाला भिडले असून, कोथंबिरीची जुडी २०० रूपये तर इतर भाज्यांचे दरही १५० रूपये किलोपर्यंत जाउन पोहचले आहेत. विशेष म्हणजे नवरात्रोत्सव हा उपवासाचा कालावधी मानला जातो. या काळात भाज्यांना मागणीही कमी असते मात्र तरीही अशाही काळात भाज्यांचे दर गगनाला भिडल्याने किचनचे बजेट कोलमडले आहे.

सर्वच भाज्यांत वापरली जाणारी कोथिंबीर सध्या नाशिकमध्ये ’भाव’ खात असून कोथिंबीर जुडी थेट 200 रुपयांना विकली जात आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी भाजीपाला दर मात्र चढेच आहेत. अशातच सर्वच भाज्यांत वापरल्या जाणार्‍या कोथिंबीर जुडीने उच्चांक गाठला आहे. ऐन सणाच्या काळात कोथिंबिरीचा भाव वाढला आहे. आवक कमी झाल्याने नाशिकमध्ये सध्या कोथिंबिरीला चांगला भाव मिळत आहे. जवळपास 160 रुपये जुडी एवढा भाव व्यापार्‍यांकडून शेतकर्‍याला मिळत असून बाजारात 200 रुपयांनी कोथिंबीर जुडीची विक्री होत आहे. नियमित होत असेल्या आवकेच्या तुलनेत अवघी 50 ते 60 टक्के आवक सध्या सुरू असल्याने भाजीपाल्याचे दर कडाडलेलेच आहेत. पालेभाज्या तर मिळेनाशा झाल्या आहेत. ज्या थोड्याफार पालेभाज्या उपलब्ध होत आहेत. त्यांचे दरही जास्त असल्याचे चित्र आहे.

शेतकरी बांधवांकडील भाजीपाला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल होत असतो. तेथून विक्रेत्यांकडून भाजीपाला खरेदी करत किरकोळ बाजारात विक्री केली जाते. नियमित आवकेच्या सुमारे 50 ते 60 टक्केच आवक सध्या होत आहे. त्यामुळे कोणत्याही भाजीचे दर 20 किंवा 30 रुपये पावशेरपासून सुरु होऊन 120 ते 160 रुपये किलोपर्यंत जात आहेत. दरम्यान बाजारात भेंडी, शिमला, गिलके, दोडके, बटाटे, वांगी अशा नेहमीच्या भाज्या आवाक्याबाहेर दिसत असल्याने मुलांच्या डब्यात काय द्यायचे असा प्रश्न गृहिणींना सतावत आहे.

असे आहेत दर
First Published on: September 30, 2022 1:31 PM
Exit mobile version