Vinod Dua: ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन, रुग्णालयात सुरु होते उपचार

Vinod Dua: ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन, रुग्णालयात सुरु होते उपचार

Vinod Dua: ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन, रुग्णालयात सुरु होते उपचार

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचं वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले आहे. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुआ यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. काही महिन्यांपुर्वी विनोद दुआ यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांची मुलगी अभिनेत्री मल्लिका दुआने वडिलांची तब्येत बिघडली असून रुग्णालयात दाखल केल्याची माहिती दिली आहे. तर शनिवारी मल्लिकाने इंस्टाग्रामवर पोस्ट करत विनोद दुआ यांचे निधन झाले असल्याची माहिती दिली आहे. काही दिवसांपुर्वी विनोद दुआ यांच्या मृत्यूची अफवा पसरली होती यावेळी देखील मल्लिकाने या अफवांचे खंडन केलं होते.

ज्येष्ठ पत्रकार विनोद विनोद दुआ यांना २९ नोव्हेंबरला तब्येत बिघडल्यामुळे दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आयसीयुमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मल्लिका दुआने इंस्टाग्रामवर पोस्ट करत दुआ यांच्या निधनाची माहिती दिली आहे. मल्लिकाने म्हटलं आहे की, आमचे निर्भय, असाधारण व्यक्तिमत्व असलेले वडील विनोद दुआ यांचे निधन झाले आहे. जे उत्तम जीवन जगले आणि ४२ वर्षांमध्ये पत्रकारितेत उंच शिखरावर जाऊन काम केले. ते कायमच सत्तेसमोर खरं बोलले आहेत. ते आता माझी आई आणि त्यांच्या पत्नीसोबत स्वर्गात आहेत. आता स्वर्गात ते सोबत राहतील गातील आणि आवडते गाणही गातील तसेच स्वयंपाक आणि प्रवास करतील, असे मल्लिकाने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.

विनोद दुआ यांच्यावर रविवार ५ डिसेंबर रोजी लोधी स्मशानभूमी येथे दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील असे मल्लिकाने सांगितले आहे. विनोद दुआ यांना जुन महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. ७ जुनला ते कोरोनामुक्त होऊन घरी परतले होते. परंतु त्यांच्या पत्नीचा कोरोनामुळे १२ जूनला मृत्यू झाले आहे. दोघांनाही कोरोनाची एकाचवेळी कोरोनाची लागण झाली होती.

६७ वर्षीय विनोद दुआ यांचा जन्म दिल्लीमध्ये झाला होता. त्यांनी आतापर्यंत दूरदर्शन आणि एनडीटीव्हीमध्ये काम केलं आहे. ते १९९६ मध्ये पहिले इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार होते त्यांना रामनाथ गोयंका अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच २००८ मध्ये त्यांना पत्रकारितेसाठी पद्म श्री देऊन सन्मानित करण्यात आले आहे.


हेही वाचा : असा पंतप्रधान कधीही नसावा : ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रझा यांचे मोदींवर टिकास्त्र


 

First Published on: December 4, 2021 7:34 PM
Exit mobile version