अमानुषतेचा कळस! झोपलेल्या कुत्र्याला मरेपर्यंत केली मारहाण

अमानुषतेचा कळस! झोपलेल्या कुत्र्याला मरेपर्यंत केली मारहाण

अमानुषतेचा कळस! झोपलेल्या कुत्र्याला मरेपर्यंत केली मारहाण

एका अल्पवयीन मुलाने एका झोपलेल्या कुत्र्याला इतकी अमानुषपणे मारहाण केली. ज्यामध्ये कुत्र्याचा डोळा बाहेर आला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. ही धक्कादायक आणि निर्दयी घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्राणी प्रेमींनी याबद्दल तक्रार दाखल केली. यानंतर याप्रकरणी दोन तरुणांना अटक केली गेले आहे. व्हिडिओ करत असलेल्या तरुणाला पोलिसांना अटक केली आहे.

एक अल्पवयीन मुलगा झोपलेल्या कुत्राला बेदम मारहाण करत असल्याचे व्हायरल व्हिडिओमधून समोर आले. या अमानुष मारहाणीमुळे कुत्र्याचे डोळे बाहेर आले आणि त्यामुळे कुत्रा तिथून पळून देखील जाऊ शकला नाही.

यामुळे केली कुत्राला मारहाण

कुत्रा जिथे राहत होता. तिथून पासून चार किलोमीटर दूर असलेल्या दूध वाल्याच्या अंगातील कोंबड्यांचा शिकार करीत असल्याचा संशय या दोन मुलांना होता. त्यामुळे त्या कुत्राला एके दिवशी घरी आणून त्याला बेदम मारहाण केली. या घटनेच्या व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्था पुढे आली आणि त्यांनी या दोन तरुणांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.


हेही वाचा – भिकारी महिलेला मोबाईलचे क्रेझ; झोपडीत सापडले महागडे मोबाईल


 

First Published on: October 25, 2020 2:16 PM
Exit mobile version