Video : आरोग्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात ग्रामीण आरोग्यकेंद्राची दुरवस्था, संभाजीराजे संतापले

Video : आरोग्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात ग्रामीण आरोग्यकेंद्राची दुरवस्था, संभाजीराजे संतापले

सोलापूर- राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मतदारसंघ असलेल्या सोलापुरातील ग्रामीण आरोग्यकेंद्राची दुर्दशा झाल्याचे वास्तव समोर आले आहे. राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे भोसले यांनी यांसदर्भात व्हिडीओ पोस्ट केला असून संताप व्यक्त केला आहे. ग्रामीण आरोग्यकेंद्राची दुरवस्था झाल्याप्रकरणी संभाजीराजेंनी थेट तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याचीच मागणी केली आहे.

राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे भोसले यांनी आरोग्यकेंद्राचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नादुरुस्त असलेले संगणक आणि वैद्यकीय उपकरणे, अस्वच्छ शौचालय, पाण्याचं दुर्भिक्ष्य, डॉक्टरांची वाणवा, आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता,आदी सर्व समस्या व्हिडीओच्या माध्यमातून संभाजीराजेंनी मांडली आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत स्वत:च्या मतदारसंघातील ग्रामीण आरोग्यकेंद्राची सुव्यवस्था ठेवू शकत नाहीत. त्यांचा भोंगळ कारभार मी स्वतः उघडकीस आणून एक महिना झाला तरीदेखील परिस्थिती जैसे थे आहे ! इतके हे मंत्री महोदय निर्ढावलेले आहेत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी अशा संवेदनाहीन व मग्रूर मंत्र्याचा तात्काळ राजीनामा घ्यावा अन्यथा स्वराज्य यामध्ये उतरेल, असा थेट इशाराच संभाजीराजेंनी तानाजी सावंत यांना दिला आहे.


तानाजी सावंत यांचा मोठा गौप्यस्फोट

राज्यातील सत्तांतरावरून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, सरकार सत्तेत आल्यानंतर ३० डिसेंबर २०१९ ला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. ३ जानेवारी २०२० च्या आसपास सुजितसिंह ठाकूर आणि मी देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने तमाम महाराष्ट्रात पहिल्यांदा बंडखोरी केली. धाराशिव जिल्हा परिषद शिवसेना-भाजपची, जे साडेबारा कोटी जनतेने मँडेट दिलं होतं, ती सुरुवात या ठिकाणाहून केली, ही वस्तुस्थिती आहे. त्या वेळी बंडाचं निशाण फडकवणारा तानाजी सावंत होता. मी तेवढ्यापुरता थांबलेलो नव्हतो. ज्यांना इशारा द्यायचा होता, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा मातोश्रीवर जाऊन हात करून सांगितलं, की परत या मातोश्रीची पायरी चढणार नाही आणि हे सरकार उलथवल्याशिवाय तानाजी सावंत गप्प बसणार नाही.”

First Published on: March 28, 2023 1:30 PM
Exit mobile version