पालकमंत्र्यांच्या गाडीसमोर आलेल्या विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार

पालकमंत्र्यांच्या गाडीसमोर आलेल्या विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार

प्रातिनिधिक फोटो

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क 30 टक्के माफ करावे, या मागणीचे निवेदन देण्यासाठी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या गाडीसमोर आलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी जोरदार लाठीमार केला.

अखिल भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांना विविध मागण्यांसाठी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी पालकमंत्र्यांना भेटण्याचा अनेकवेळा प्रयत्नदेखील केला. मात्र, पालकमंत्र्यांसोबत भेट होऊ शकली नाही. त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. अब्दुल सत्तार यांची गाडी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येताच विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलक विद्यार्थी पालकमंत्र्यांना आपल्या मागण्यांबाबतचे निवेदन देणार होते. मात्र पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ 12 ते 15 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

‘विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे’, असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. ‘उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा’, अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.

First Published on: August 26, 2020 11:52 PM
Exit mobile version