राऊतांमध्ये स्किझोफ्रेनियाची लक्षणे दिसताहेत; मोदींवरील त्या टीकेला विजय शिवतारेंकडून जोरदार प्रत्युत्तर

राऊतांमध्ये स्किझोफ्रेनियाची लक्षणे दिसताहेत; मोदींवरील त्या टीकेला विजय शिवतारेंकडून जोरदार प्रत्युत्तर

पुणे : सोमवारी (29 एप्रिल) पुण्यातील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र भटकत्या आत्म्यांचा शिकार झाला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता केली होती. मोदींच्या या टीकेनंतर विरोधकांनी त्यांच्या निशाणा साधला आहे. नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. (Vijay Shivtare hits back at Sanjay Raut’s criticism of Narendra Modi)

संजय राऊतांच्या टीकेवर बोलताना विजय शिवतारे म्हणाले की, संजय राऊत यांना स्किझोफ्रेनियाची लक्षणे दिसताहेत, त्यांना रात्री स्वप्नं पडतात आणि दुसऱ्या दिवशी काय बोलतात हे त्यांच त्यांनाच कळत नाही. कारण पंतप्रधान मोदींची सभा जिकडे असते तिकडे एसपीजीची कडक सुरक्षा असते. सभेच्या बाहेर हजारो लोकं बाहेर होती. मोठी सभा झाली आणि मोदी विकासाबाबत बोलले. पण काही विरोधक सभेला लोकं पाठवत असतात आणि सभेतून उठून जायला सांगतात. त्यांचे कॅमेरामन फोटो काढत असतात आणि नंतर ते व्हायरल केले जातात. मुळात मोदींची कालची सभा एक लाख लोकांची झाली. अशी सभा कुणीही घेऊन दाखवावी, असं आव्हान विजय शिवतारे यांनी केले.

हेही वाचा – Sanjay Raut : बलात्कार करणाऱ्या व्यक्तीसाठी मोदी मत मागतायत; संजय राऊतांचा घणाघात

भटकती आत्मावरील टीकेवर बोलताना विजय शिवतारे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचंड लोकप्रियता आहे. भटकती आत्मा हे जनरल वक्तव्य होतं. कुणाला एकाला टार्गेट केलं असं बोलणं चुकीचे आहे. कालपासून भटकती आत्मा असे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. शरद पवारांवर टीका केली असेल असं म्हणणं चुकीचं आहे. पण सासवडमध्ये जी आमची सभा झाली, त्या सभेला हजारो लोकांची गर्दी होती. त्यामुळे संजय राऊतांना माझं खुलं आव्हान आहे, त्यांनी रेसकोर्स मैदानावर सभा घेऊन दाखवावी, असं विजय शिवतारे म्हणाले.

सुनेत्रा पवार प्रत्येक मतदारसंघात लीड घेणार (Sunetra Pawar will lead in every constituency)

दरम्यान, बारामती लोकसभेवर भाष्य करताना शिवतारे म्हणाले, सुनेत्रा पवार प्रत्येक मतदारसंघात लीड घेणार आहेत. ही निवडणूक भावकी आणि गावकीची नाही. तर ही लढाई मोदी आणि राहुल गांधी यांच्यात लढाई आहे. बुधवारी (01 मे) संध्याकाळी सहा वाजता भोर मतदारसंघात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची मोठी सभा होणार आहे. या सभेच्या माध्यमातून भोर मतदारसंघातील प्रश्न सोडवले जाणार आहेत. वाघोली आणि वारजे या दोन ठिकाणी नितीन गडकरी यांच्या सभा होणार आहेत. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची एक सभा बारामती लोकसभा मतदारसंघात होणार आहे, अशी माहिती विजय शिवतारे यांनी दिली.

हेही वाचा – Ravindra Waikar : रवींद्र वायकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर

Edited By – Rohit Patil

First Published on: April 30, 2024 2:18 PM
Exit mobile version