शिवसेना- भाजपा युतीवर विक्रम गोखले म्हणतात, दोन्ही पक्षांनी….

शिवसेना- भाजपा युतीवर विक्रम गोखले म्हणतात, दोन्ही पक्षांनी….

vikram gokhale passed away in pune cm eknath shinde devendra fadanvis uddhav thackeray paid tribute

अभिनेत्री कंगना रनौतच्या स्वातंत्र्याबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याचे समर्थन केल्याने अभिनेते विक्रम गोखले वादात अडकले आहेत. अशातच आज पत्रकार परिषद घेत विक्रम गोखलेंनी कंगनाच्या वक्तव्याचे पुन्हा समर्थन देत आपले मत व्यक्त केले आहे. याशिवाय त्यांनी शिवसेना-भाजपा युतीवरही पुन्हा भाष्य केलं आहे. “करोडो लोकांनी विश्वास ठेवला, निवडून दिले, निवडणूक झाली. मात्र त्यानंतर जे झाले ते इतकं अनपेक्षित होतं, धक्कादायक होतं ज्याला आपला विश्वास घात झाल्यास सारखं वाटलं, हा विश्वास घात नाही तर काय आहे? दोन्ही पक्षांच्या चुका आहेत. अशाप्रकारे विक्रम गोखलेंनी भाजपा शिवसेना युतीवर भाष्य केले. यावरून त्यांनी भाजपा शिवसेनेने पुन्हा एकदा एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त केली,

“खोट्या धर्मनिरपेक्षतेला माझा विरोध असून मी धिक्कार करतो. माझा त्यांच्यावर विश्वास नाही. स्युडो सेक्युलर लोकांना वाटतं की, मी ठराविक लोकांच्या बाजूनं बोलतो. पण मी विद्यमान सरकारच्या विरोधातही जाहीरपणे बोलतो,” असं गोखले म्हणाले.

“दोन चांगले कार्य करणारे पक्ष एकत्र येऊ इच्छितात. त्यावर मी विश्वास ठेवला, करोडो लोकांनी विश्वास ठेवला, निवडून दिले, निवडणूक झाली. मात्र त्यानंतर जे झाले ते इतकं अनपेक्षित होतं, धक्कादायक होतं ज्या नेत्याला आपल्या विश्वास घात झाल्यास साखरं वाटलं, हा विश्वास घात नाही तर काय आहे? दोन्ही पक्षांच्या चुका आहेत…दोन्हीही. दोन्ही पक्ष माझे मित्र आहेत. मात्र दोन्ही पक्षांच्या चुका झाल्या आहेत. जबाबदार अशा या पक्षांतील नेत्यांशी मी बोललो आहे. त्यामुळे मी म्हणतो अजूनही म्हणतो की, अजूनही वेळ गेलेली नाही. फार कड्यावरती आपला देश उभा आहे. अशा माझी खात्री आहे. शंका नाही. १९६२ सालचा भारत आत्ता २०२१ मध्ये राहिलेला नाही. हे जेव्हा जगाला कळते आणि आपल्या शत्रूंनाही कळते तेव्हा ते थांबतात.” असंही विक्रम गोखले म्हणाले.

“राजकीय पक्षांमध्ये काही चांगली माणसं आहेत. त्यांच्याबद्दल मी चांगलं बोलतो. जे चांगलं ते चांगलं जे वाईट ते फेकून द्या असा मताचा मी आहे. या देशाचे तुकडे करु येथे कम्युनिझमची सत्ता यावी अशी काहींची सुप्त इच्छा आहे. मात्र याला माझा विरोध आहे. भाजपा आणि शिवसेना एकत्र यावी अशी माझी इच्छा असून त्याची गरज आहे. स्युडो सेक्युलॅरिझमला त्याची भीती वाटते,” असं ते म्हणाले.

“जो धर्म शिरच्छेद करा असं शिकवतो, तो आता गेली दीड हजार वर्षं याठिकाणी हात-पाय पसरवण्य़ाचा प्रयत्न करतोय. त्यांनी तळ ठोकू नये म्हणून काही जण प्रयत्न करत आहेत, मात्र सत्तेची भूक लागलेले राजकीय नेते किंवा पक्षांना हा देश एकसंध राहावा हे सहन होत नाही. अमेरिकेनं ज्यांना व्हिसा नाकारला, त्यांचा सन्मान होतोय हे त्यांना पाहवत नाही. एक माणूस, एक पक्ष काही तरी करतोय म्हटल्यावर तो लोकप्रिय होणारच. आमचं काय होईल असं वाटून इतर भुंकायला सुरुवात करतात.” असं म्हणत विक्रम गोखले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आणि भाजपाचे कौतुक केले.


 

First Published on: November 19, 2021 1:35 PM
Exit mobile version