२०१४ च्या गार्डीयन पेपरमध्ये लिहिले तेच कंगना बोलली- विक्रम गोखले

२०१४ च्या गार्डीयन पेपरमध्ये लिहिले तेच कंगना बोलली-  विक्रम गोखले

vikram gokhale passed away in pune cm eknath shinde devendra fadanvis uddhav thackeray paid tribute

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने देशाच्या स्वांतत्र्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याला समर्थन दिल्याने ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यामुळे गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांसह अनेकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे वादळ सुरु केले आहे. यातच आज विक्रम गोखले यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा कंगनाच्या वक्तव्याला समर्थन दिले आहे. “१८ मे २०१४ मधून इंग्लंडमधून निघालेला गार्डीयन पेपर वाचा त्या दिवशीचा अंक वाचा. त्यात काय लिहिले ते काळजी पूर्वक वाचा. तेच कंगना बोलतेय.” असं विक्रम गोखले म्हणाले आहेत.

यावर विक्रम गोखले पुढे म्हणाले की, “कंगना रनौत या मुलीची दोन वर्षात केलेली जी भाषण आहेत ती तिची वैयक्तिक मत आहेत. भारतीय स्वातंत्र्यावर केलेल्या वक्तव्यावर तिची काही स्वत:ची मतं असू शकतात. तिच्या मताला दुजोरा दिला यामागे माझेही काही कारणं असू शकतात. मात्र समजून न घेत ताबडतोब धुरळा उडवण्यास सुरुवात झाली. त्या मुलीची माझी ओळख नाही. मी कधी तिच्यासोबत काम केले नाही तिच्यासोबत काही संबंध नाही. परंतु कोणतरी काही तरी बोलत असेल त्याची दखल घेणं आणि त्याबद्दल आपलं मत असेल आणि आवश्यकता असेल तर ते मत व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे.”

” २०१४ पासून माझ्या सारख्या सामान्य भारतीयाला खरं स्वातंत्र्य मिळालं”

“माझी तिच्याशी ओळखं नसली तरी माझ्या राजकीय अभ्यासाची आणि माझी चांगली ओळख आहे, त्यामुळे मी तिच्या वक्तव्याला दुजोरा दिला त्यामागे माझीही काही कारण आहेत. ती कारण आत्ता सांगत बसत नाही. १८ मे २०१४ मधून इंग्लंडमधून निघालेला गार्डीयन पेपर वाचा त्या दिवशीचा अंक वाचा. त्यात काय लिहिले ते काळजी पूर्वक वाचा. तेच कंगना बोलतेय. माझ्याकडे त्याची कॉपी आहे. त्यामुळे कंगना काहीही चुकीचे बोलली नाही, असं मी म्हणालो त्यावरून बोंबाबोंब सुरु झाली. त्यामुळे माझी ओळख माझ्या राजकीय अभ्यासाची आहे. भारतीय नागरिक म्हणून आणि राजकीय अभ्यासक म्हणून… विश्लेषक नाही… हा माझा अभ्यास आहे, त्यामुळे २०१४ पासून माझ्या सारख्या सामान्य भारतीयाला खरं स्वातंत्र्य मिळालं हे माझे प्रामाणिक मत आहे आणि ते मी मुळीच बदलणार नाही. त्यामुळे मी त्यांना काय बोललो आहे मुळ भाषणामध्ये ते दाखलवचं नाही.” असंही विक्रम गोखले म्हणाले.

“त्यामध्ये मी काय बोललो आहे, हे अश्रू ठाळणारे जे स्वातंत्र्य सैनिक आहेत ज्यांचे मला शिव्या शाप मला मिळत आहेत. त्यांना कदाचित कळेल की, यात विक्रम गोखले काय म्हणाले होते आणि विपर्यास कसा केला गेला. मी कोणत्याही स्वातंत्र्य सैनिकाचा अपमान केलेला नाही. यातील मतितार्थ असा आहे की, बाकीच्या लोकांनी जे प्राण दिले, फासावर लटकवले. ब्रिटीशाधिकाऱ्यांना गोळ्या घातल्या. त्यांची अवहेलना झाली. त्याबद्दल आपण कोणालाही शरम वाटत नाही, त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही. १८ मे २०१४ रोजी माझा भारत जागतिक राजकीय पटलावरली एक सक्षम देश म्हणून उभं राहायला सुरुवात केली आहे. याचा मला अभिमान आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे कोणावरही लादायचे नाही. असंही विक्रम गोखले म्हणाले.

“शाहरुख, आर्यन काय बॉलिवूडमधील कुठलाही नट माझं वाकटं करु शकत नाही”

“नको त्या ठिकाणी मीडियाने नको ते संदर्भहीन प्रश्न विचारले त्यातील हा एक प्रश्न. माझ्या दृष्टीने आर्यन खान, शाहरुख आणि त्यावर जे काय सुरु आहे ते शुल्लक आहे. माझ्या ७६ वाढदिवसादिवशी जे शब्दही माझ्या तोंडात नाही त्यावर मला प्रश्न विचारणं हा पहिला गुन्हा मीडियाचा आहे. मी घाबरून मिबरून नाही म्हणालो नाही, शाहरुख, आर्यन काय बॉलिवूडमधील कुठलाही नट माझं वाकटं करु शकत नाही. करायचं जरी केला तरी मी माझं नाव विक्रम चंद्रकांत गोखले असं लावतो. मी दुसऱ्या कोणाचं बापाचं नाव म्हणून लावत नाही. त्या ठिकाणचा तो फालतु विषय होता. याशिवाय २१ वर्षांचा मुलगा जो बॉर्डरवर उभा राहतो आणि दहशतवादाला गोळीनं मारतो तो माझा नायक आहे. शाहरुख नाही आणि आर्यन पण नाही. असंही विक्रम गोखले म्हणाले.


 

First Published on: November 19, 2021 12:47 PM
Exit mobile version