महापालिका मुख्यालयातील वॉर रुमला ‘कोरोना’ विषाणूची टकटक

महापालिका मुख्यालयातील वॉर रुमला ‘कोरोना’ विषाणूची टकटक

कोरोना कोविड- १९ चा वॉर रुम ज्या महापालिकेच्या आपत्कालिन नियंत्रण कक्षात आहेत, तेथील दोन व्यक्ती कोरोना संशयित असल्याचे आढळून आले आहेत. आता या कोरोना संशयित दोघांना त्याच ठिकाणी क्वारनटाईन करण्यात आले आहे. जेणेकरून तिथे काम सुद्धा करतील आणि क्वारनटाईनमध्ये राहतील. त्यामुळे येथील सर्वांची कोरोना तपासणी करून याठिकाणी तात्काळ सॅनिटायझेशन केले जात आहे. मात्र, आजवर मुंबईतील कानाकोपऱ्यातील कोरोना रुग्णांवर नजर ठेवून उपाययोजना आखणाऱ्या या  नियंत्रण कक्षापर्यंत हा विषाणू जावून धडकला आहे. त्यामुळे येथील वॉर रुम तात्पुरत्या स्वरुपात परेलमधील आपत्कालिन कक्षात हलण्यात आल्याचे बोलले जात आहे.

मुंबई महापालिका मुख्यालयातील नवीन विस्तारीत इमारतीमधील दुसऱ्या मजल्या महापालिकेचा सुसज्ज असा आपत्कालिन नियंत्रण कक्ष आहे. या नियंत्रण कक्षामाध्यमातून आजवर विविध प्रकारच्या आपत्कालिन घटना हाताळून त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. परंतु आता कोरोनाच्या आजाराच्या वेळीही हा नियंत्रण कक्ष कोरोनाचा प्रमुख वॉर रुम बनला आहे. या वॉर रुमच्या समन्वय म्हणून अश्विनी भिडे व मनिषा म्हैसकर तसेच रामास्वामी या कामकाज पाहत आहे. विशेष म्हणजे या नियंत्रण कक्षातील दोन चतुर्थ श्रेणीतील कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचे बोलले जात आहे. रविवारी या दोघांची चाचणी केल्यानंतर सकाळी या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजते. त्यामुळे नियंत्रण कक्षातील सर्व कर्मचाऱ्यांची तात्काळ चाचणी करण्याचा निर्णय घेवून नवीन इमारतीचा संपूर्ण परिसर व कार्यालये निजंर्तुक करण्याचा निर्णय घेतला जाहे.

याच नियंत्रण कक्षात महापालिका आयुक्तांपासून महापालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होत असतात. तसेच लोकप्रतिनिधीही या नियंत्रण कक्षात येत असतात. या कक्षाचे सॅनिटायझेशन केले जात असले तरी ज्या कामगाराला याची लागण झाली आहे. तो धारावीत राहणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महापालिका आपत्कालिन नियंत्रण कक्षात आता बाहेरच्या कुणाही अधिकाऱ्याला प्रवेश नाही. मात्र, तोपर्यंत परेलमधील कल्पतरु इमारतीतील आपत्कालिन विभागाच्या कार्यालयातून वॉर रुमचे कामकाज करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते. दरम्यान, या दोन्ही कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेतल्यापासून याठिकाणी वरिष्ठ अधिकारी आलेले नाहीत.

महापालिका आपत्कालिन नियंत्रण कक्षाचे प्रमुख अधिकारी महेश नार्वेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अजुनही संशयित रुग्ण असल्याचे सांगितले. मात्र, नियंत्रण कक्षासह मुख्यालय परिसरात जंतूनाशक फवारणी करून निजंर्तुकीकरण केले जात आहे. याशिवाय आता या कक्षात यापुढे प्रत्येक आठवड्याला कर्मचाऱ्यांची चाचणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

First Published on: April 20, 2020 5:19 PM
Exit mobile version