राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना रेड,ऑरेंज अलर्ट, लोकल विस्कळीत

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना रेड,ऑरेंज अलर्ट, लोकल विस्कळीत

मुंबई | राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कायम आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. हवामान विभागाने रायगड, ठाणे, पालघर आणि पुण्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे तर मुंबई, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच मुंबईत आज मुसळधार पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

हार्बर मार्गावरील 30 मिनिटे उशीराने सुरू आहे तर मध्य रेल्वेची वाहतूक 15-20 मिनिटे उशारी सुरू आहे. राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागने वर्तवली आहे. रायगड, ठाणे, पालघर आणि पुण्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे तर मुंबई, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाच्या शाळांना सुट्टी दिली असून रेल अलर्टमुळे पालघरच्या शाळांना देखील सुट्टी जाहीर केली आहे. तसेच सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नाशिक आणि विदर्भाला हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.

मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा 

मुंबईमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली असून मुंबईतील सखल भागात पाणी साचले पाहायला मिळाले. यामुळे मुंबईची लाईफलाईन लोकल रेल्वेच्या सेववर देखील परिणाम झाल्याचे दिसून आले. आजही मुंबई मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिली आहे.

सिंधुदुर्गात पावसाचा जोर कायम

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देखील पावसाचा जोर कायम आहे. माणगावमधील सर्व रस्ते हे पाण्याखाली गेले असून गावकरी हे जीव मुठीत धरून रस्त्यावरून सुरक्षित ठिकाणी जात आहेत. तसेच निर्मला नदीला पूर आल्याने नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीचे पाण्यामुळे शेती पाण्याखाली गेली आहे.

First Published on: July 21, 2023 9:06 AM
Exit mobile version