पाणीटंचाई अंतर्गत प्रशासनाने नाशिककरांसाठी प्रशासनाने ‘हे’ निर्देश

पाणीटंचाई अंतर्गत प्रशासनाने नाशिककरांसाठी प्रशासनाने ‘हे’ निर्देश

प्रातिनिधिक फोटो

पिण्याच्या पाण्याची टंचाई अंतर्गत घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत शासनाने विविध सूचना निर्गमित केल्या आहेत. टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे अतिशय खर्चिक असल्याने अपरिहार्य परिस्थितीतच टँकर मंजूर करण्याचे तसेच तत्पूर्वी अन्य उपाययोजनातून पाणी पुरवठा करणे शक्य आहे का याबाबत तपासणी करण्याचे निर्देश सर्व जिल्ह्यांना देण्यात आले आहेत.

राज्यात दुष्काळ जाहीर

२९ नोव्हेबर रोजी शासन निर्णय काढून दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजूर करण्याचे संबंधित उप विभागीय अधिकारी यांना दिले आहेत. मात्र टँकरमंजूर करणे अतिशय खर्चिक उपाययोजना असल्याने ही उपाययोजना अपरिहार्य परिस्थितीतच कमीत कमी खर्चाची उपाययोजना म्हणून मंजूर करणे आवश्यक आहे. याबाबत शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या उप सचिवानी सर्व जिल्ह्यांना लेखी सूचना दिल्या आहेत. यामध्ये टँकर मंजूर करण्यापूर्वी विहीर/विंधन विहीर अधिग्रहण, तात्पुरती पाणी पुरवठा योजना, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, बंद असलेल्या प्रादेशिक योजना कार्यान्वित करणे याबाबत तपासणी करून पाणी पुरवठा करणे शक्य आहे का याबाबत पडताळणी करणे आवश्यक असल्याचे तसेच ज्या ठिकाणी टंचाई अंतर्गत घेण्यात येणाऱ्या आकस्मिक उपाययोजना घेवूनही पाणी उपलब्ध होत नसल्यास टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे करण्याचे सूचित करण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याची उपाययोजना करताना पशुधनासाठी लागणाऱ्या पाण्याची गरज विचारात घेवून उपायोजना राबविण्याचे तसेच टँकर मंजूर करताना उप विभागीय अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचना व शासन निर्णयांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणेबाबतचे निर्देशही देण्यात आले आहेत.

First Published on: December 13, 2018 10:33 PM
Exit mobile version