हवामान खात्याने दिला Alert; राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचं Comeback!

हवामान खात्याने दिला Alert; राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचं Comeback!

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती तर काही ठिकाणी पावसाने दमदार हजेरी देखील लावली होती. मात्र श्रावण महिन्यात राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचं कमबॅक होणार असल्याचे सांगितले जात आहे. येत्या दोन दिवसांत जोरदार पाऊस होणार असल्याची माहिती माहिती हवामान खात्यानी दिली आहे. तर पुढच्या २४ तासांत पावसाचा जोर वाढणार असून मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये सध्या ढगाळ वातावरण असून हलका पाऊस सुरू आहे.

गेल्या २४ तासात मुंबई आणि परिसरात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून पुढच्या २४ ते ४८ तासांत मुंबई आणि ठाण्यात मध्यम ते जोरदार पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पुढच्या ४८ तासात मराठवाडा व इतर शहरांमध्ये मध्यम/जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या हिमालय पर्वत रांगांजवळ द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे संपूर्ण उत्तर भारत, पंजाब, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, मध्य प्रदेश, बिहार आणि ईशान्य भारतात २९ ते ३१ जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे. तर १ ऑगस्टपासून कोकणासह मुंबई, ठाणे, पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सध्या मुंबई आणि मुंबईउपनगरात पावसाने कोसळण्यास सुरूवात केली असून हवामान खात्याने (IMD), ठाणे आणि मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पावसाचे संकेत देली असून अनेक ठिकाणी अलर्ट जारी केला आहे. आज मध्य महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी किमान पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे, तर उद्या आणि आगामी काळात पावसाचा जोर वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे.


राज्याचं पावसाळी अधिवेशन आता सप्टेंबरमध्ये होणार?

First Published on: July 28, 2020 1:30 PM
Exit mobile version