Weather Update : राज्यातील नागपूर, वर्ध्यासह चार जिल्ह्यांत पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

Weather Update : राज्यातील नागपूर, वर्ध्यासह चार जिल्ह्यांत पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

Weather Update : राज्यातील नागपूर, वर्ध्यासह चार जिल्ह्यांत पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

राज्यात मागील काही दिवसांपासून वातावरणात अनेक बदल जाणवत आहेत. यात राज्यांतील कोकण, मराठवाडा, विदर्भात अनेक भागाला गेल्या दोन दिवसांपासून विजांचा कडकडासह जोरदार वारे वाहत आहेत. अचानक झालेल्या या अवकाळी पावसाने शेतीचे आणि फळबागांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यात राज्यातील अनेक भागांमध्ये मंगळवारपर्यंत पाऊस कायम राहणार असल्याचे अंदाज व्यक्त केला जात आहे. यात विदर्भातीलनागपूर, वर्धा, भंडारा , गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती अकोला, यवतमाळ बुलढाणा वाशिम जिल्ह्यामध्ये आजपासून मुसळधार अवकाळी पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याचा नागपूर केंद्राने वर्तवला आहे.

यामुळे ३ मेपासून पूर्व, पश्चिम आणि मध्य विदर्भात जोरदार पाऊसाला सुरुवात झाली आहे. विदर्भामध्ये मंगळवारी पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता आहे. यामध्ये भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. परंतु ४ आणि ५ मे या भागात कोरडे वातावरण राहणार असून पून्हा ६ आणि ७ मेला बहुतांश जिल्हांमध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच अनेक भागात पून्हा एकदा गारा पडण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मात्र याची तीव्रता कमी असेल अशी शक्यता आहे.

मध्य प्रदेशचा इशान्य भाग ते विदर्भ या भागामध्ये असलेली द्रोणीय स्थिती, मध्य महाराष्ट्रावर असलेली चक्रीय वात स्थिती, आग्नेय राजस्थान ते पूर्व मध्य प्रदेश या भागातील द्रोणीय स्थिती यामुळे महाराष्ट्रामध्ये सध्या अवेळी पाऊस पडत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.


 

First Published on: May 3, 2021 5:50 PM
Exit mobile version