चाळीसगावच्या ढगफुटीनंतर आता नाशिकला ऑरेंज अलर्ट

चाळीसगावच्या ढगफुटीनंतर आता नाशिकला ऑरेंज अलर्ट

दोन आठवडे विश्रांती घेतलेला पाऊस दोन दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. चाळीसगाव तालुक्यात ढगफुटीसारख्या पावसामुळे दाणादाण उडालेली असतानाच, आता भारतीय हवामान खात्याने नाशिकला ऑरेंट अलर्ट दिला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासकीय यंत्रणाही आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज झाल्या आहेत.

पहाटेपासून सर्वदूर पावसाला सुरुवात झाल्याने पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे. पीक वाढीसाठीही पोषक वातावरण तयार झाले आहे. शहरात मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावासाचा इशारा दिला आहे. यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने याचा प्रभाव उत्तर महाराष्ट्रावर जाणवणार आहे. त्यामुळे नाशिकलाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, बुधवारी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नाशिक जिल्हयात आतापर्यंत ६८ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

First Published on: August 31, 2021 6:35 PM
Exit mobile version