Lockdown: लोकांना आता फार काळ अडवून ठेवणे योग्य नाही; अजित पवारांची भूमिका

Lockdown: लोकांना आता फार काळ अडवून ठेवणे योग्य नाही; अजित पवारांची भूमिका

लवकरच राज्य आणि देशातील लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपुष्टात येणार आहे. त्यानंतर लॉकडाऊन कितपत वाढवावा हे ठरविण्याचे अधिकार आता राज्यांना देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तसेच देशाचे आर्थिक चक्र असलेल्या मुंबईत भारतातील सर्वाधिक रुग्ण आढळलेले आहेत. त्यामुळे राज्य सरकार लॉकडाऊनबाबत काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर रेड झोनमधील काही अटी शिथिल कराव्यात, अशी राष्ट्रवादी पक्षाची मागणी असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत. न्यूज १८ लोकमत या संकेतस्थळाने याबाबत बातमी दिली आहे.

३१ मे रोजी लॉकडाऊन संपल्यानंतर राज्यातील रेड झोन क्षेत्रात खबरदारी घेऊन काही अटी शिथिल कराव्या लागतील. याबाबत मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. मागच्या दोन महिन्यापासून राज्यातील व्यवहार बंद आहेत. लोकंही अनेक ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यामुळे लोकांना आता एका ठिकाणी फार काळ अडवून ठेवणे योग्य होणार नसल्याचे अजित पवार म्हणाले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्याचा अर्थखात्याचा कारभार आहे. त्यामुळे राज्याचे अर्थचक्र सुरळीत चालावे, यासाठी अजित पवार प्रयत्नशील आहेत. लॉकडाऊनमुळे राज्याचा महसूल पुर्णपणे बंद आहे. त्यातच आरोग्य व्यवस्था आणि कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी राज्याकडे पुरेशा प्रमाणात आर्थिक रसद नाही.

राज्याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली आहे. या बैठीकाल महाविकास आगघाडीचे प्रमुख मंत्री, मुख्य सचिव, तसेच आरोग्य, ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत औद्योगिक क्षेत्र सुरु करणे, रेड झोनमध्ये व्यवहार सुरु करणे तसेच लॉकडाऊननंतर महाराष्ट्राचे चित्र काय असेल? याबाबत चर्चा केली जाणार आहे.

 

First Published on: May 27, 2020 12:53 PM
Exit mobile version