मुंबई – पुणे डेक्कन एक्सप्रेस विस्टाडोम कोचेसचे फीचर्स पाहिलेत ?

मुंबई – पुणे डेक्कन एक्सप्रेस विस्टाडोम कोचेसचे फीचर्स पाहिलेत ?

पश्चिम घाटाचे सौंदर्य पाहण्याची पर्वणी आता प्रवाशांना उपलब्ध झाली आहे ती म्हणजे विस्टाडोम कोचच्या माध्यमातून. मध्य रेल्वेने मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेसच्या माध्यमातून विस्टाडोन कोचेस या प्रवासासाठी उपलब्ध करून दिले आहेत. पश्चिम घाटावरील नदी, खोरे, धबधबे यांच्या अविरक्षित दृश्यांचा प्रवासी आनंद घेऊ शकतात. सध्या मुंबई मडगाव जनशताब्दी ट्रेनसाठीही विस्टाडोम कोच उपलब्ध करून देण्यात आले आहे. पहिल्याच फेरीत प्रवाशांनी मुंबई पुणे प्रवासात या विस्टाडोम कोचेसचा अनुभव घेतला. परदेशातल ज्या पद्धतीने विस्टाडोम कोचेसच्या माध्यमातून प्रवासाचा आनंद घेता येतो, तसाच अनुभव या प्रवासाच्या माध्यमातून उपलब्ध झाल्याची प्रतिक्रियाही प्रवाशांनी दिली आहे. युरोपियन स्टाईलचे हे विस्टाडोम कोचेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

काय आहे विस्टा डोम कोचचे फीचर्स

आता मुंबई- पुणे मार्गावरील प्रवासी येथून जातांना जवळच्या माथेरान टेकडी (नेरळ जवळील), सोनगीर टेकडी (पळसधरी जवळील), उल्हास नदी (जांबरूंग जवळील), उल्हास व्हॅली, खंडाळा परिसर इ. चा आणि लोणावळा आणि दक्षिण पूर्व घाट विभागातील बोगदे आणि धबधबे या निसर्गरम्य सौंदर्याचा व अनुभवाचा आनंद घेऊ शकतात. विस्टाडोम कोचच्या मूलभूत विशेष वैशिष्ट्यांमध्ये वाइड विंडो पॅन आणि काचेचे छप्पर (टॉप), फिरण्यायोग्य खुर्ची आणि पुशबॅक खुर्च्या इ. समावेश आहे. युरोपियन स्टाईलचे हे विस्टाडोम कोचेस विकसित करण्यात आला आहेत. एकुण ३६० डिग्री रोटेट होणाऱ्या सीट्सही या कोचचे आणखी एक फीचर आहे.

पहिलीच फेरी फुल्ल

एलएचबी कोचसह मुंबई- पुणे डेक्कन एक्सप्रेस विशेषची पहिली फेरी दि. २६.६.२०२१ रोजी सुरू झाली. विशेष म्हणजे या मार्गावर प्रथमच व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला आहे ज्यामुळे प्रवाशांना निसर्गरम्य सौंदर्याचा आणि अनुभवाचा आनंद लुटता आला. व्हिस्टाडोम कोचमधील सर्व ४४ सीटस बुक होत्या. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्लॅटफॉर्मवर कोचजवळ खास सेल्फी लावलेल्या सेल्फी पॉईंटवर प्रवाशांनी सेल्फी घेतली. या प्रसंगी प्रवाशांनी कोचच्या आतील भागाप्रमाणे दिसणारा केकही कापला.

 

परदेशातला अनुभव आता मुंबई – पुणे प्रवासातही

“मुंबई-पुणे मार्गावर, विषेश डेक्कन एक्स्प्रेसमध्ये पारदर्शक आणि मोठ्या खिडक्या असलेला व्हिस्टाडोम कोच प्रवासाचा आनंद वाढत आहे. यामध्ये प्रवास करणारे प्रवासी आपले सुखद अनुभव सांगत आहेत. प्रवाशांच्या जागतिक दर्जाच्या अनुभवासाठी रेल्वे सतत प्रयत्नशील आहे, असे मत केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोएल यांनी ट्विटच्या माध्यमातून मांडले. उमेश मिश्रा जे आपल्या पत्नी व मुलासमवेत प्रवास करीत होते त्यांनी फक्त परदेशात उपलब्ध असलेल्या व्हिस्टाडोम कोच येथे सुरू केल्याबद्दल माननीय रेल्वेमंत्री श पीयूष गोयल जी यांचे आभार मानले. मोठ्या खिडक्या आणि मुव्हेबल सिट्समुळे त्यांच्या मुलास या प्रवासाचा पूर्णपणे आनंद घेता आला. दुसर्‍या प्रवाशाने सांगितले की, तो मुंबई आणि पुणे दरम्यानचा नियमित प्रवासी असून व्हिस्टाडोम कोच जोडल्याने भोर घाटातील प्रवास अधिक आनंददायक होईल. प्रथमच व्हिस्टाडोममध्ये प्रवास करणार्‍या सायली म्हणाल्या की त्यांनी मोठ्या खिडकीच्या पॅनेलमधून या दृश्यांचा आनंद लुटला आणि पावसाळ्यातील हिरवळीमुळे हा आनंद द्विगुणित झाला. या मार्गावर हा कोच सुरू केल्याबद्दल त्यांनी भारतीय रेल्वेचे आभार मानले. महत्वाचे म्हणजे प्रवासासाठीच्या ठरलेल्या वेळेत ही रेल्वेगाडी पुण्यात पोहोचली.


 

First Published on: June 26, 2021 3:07 PM
Exit mobile version