दिल्ली जळताना अमित शहा कुठे होते ? सामनाच्या अग्रलेखातून अमित शहांची झाडाझडती

दिल्ली जळताना अमित शहा कुठे होते ? सामनाच्या अग्रलेखातून अमित शहांची झाडाझडती

याच नकलीकडे नाक रगडत आला होता, तुमचा कपाळमोक्ष...; राऊतांचा अमित शहांवर पलटवार

राजधानीतला हिंसेचा धूर देशाला गुदमरून टाकत आहे. त्या धुरात देशाचे गृहमंत्री कुठेच दिस नाहीत. चिंता वाटावा असा हा प्रकार आहे. देशाला मजबूत गृहमंत्री लाभले आहेत, पण ते दिसले नाहीत याचे आश्चर्य वाटते. विधानसभा निवडणूकीत अमित शहा हे गृहमंत्री असतानाही घरोघर प्रचार पत्रके वाटत फिरत होते. या प्रचार कार्यासाठी त्यांनी भरपूर वेळ काढला होता, पण संपूर्ण दिल्लीत हिंसेचा आगडोंब पेटला असतानाच गृहमंत्री कुठे दिसले नाहीत अशा शब्दात अमित शहा यांच्या गैरहजेरीचा आजच्या सामनाच्या संपादकीयमधून समाचार घेण्यात आला आहे.

जे व्हायचे ते नुकसान होऊन गेले
दिल्ली जळत असताना,आक्रोश करीत असताना गृहमंत्री अमित शहा कुठे होते ? काय करीत होते ? अशे प्रश्न विचारले जात आहेत. दिल्लीच्या दंगलीत आतापर्यंत ३८ बळी गेले आहेत. तसेच सार्वजनिक व्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. केंद्रात कॉंग्रेस किंवा अन्य आघाडीचे सरकार असते व विरोधी बाकांवर भारतीय जनता पक्षाचे महामंडळ असते तर दंगलीबद्दल गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला असता. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत मोर्चे व घेरावचे आयोजन केले असते. राष्ट्रपती भवनावर धडक दिली असती. गृहमंत्री अपयशी ठरल्याचे खापर फोडून राजीनामा हवाच असा आग्रह धरला असता, पण आता असे होणार नाही. कारण भाजप सत्तेत आहे व विरोधी पक्ष कमजोर आहे. तरीही श्रीमती सोनिया गांधी यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला आहे. संपुर्ण घटनेनंतर तब्बल तीन दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजिक डोवाल हे चौथ्या दिवशी त्यांच्या सहकाऱ्यांसह दिल्लीच्या रस्त्यांवर लोकांशी संवाद साधताना दिसले. त्याने काय होणर ? जे व्हायचे ते नुकसान आधीच होऊन गेले आहे असाही टोला संपादकीयच्या माध्यमातून लावण्यात आला आहे.

First Published on: February 28, 2020 11:03 AM
Exit mobile version