दंगल होणार आहे का? भीमा-पाटस कारखाना भेटीवरून राऊंताचा सवाल

दंगल होणार आहे का? भीमा-पाटस कारखाना भेटीवरून राऊंताचा सवाल

पुणेः भीमा-पाटस कारखाना परिसरात १४४ कलम का लावण्यात आले आहे. येथे दंगल होत आहे का?. कोण दंगल घडवत आहे, असे प्रश्न ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केले.

संजय राऊत हे भीमा-पाटस कारखान्यात जाणार होते. त्यांच्या गाड्यांचा ताफा कारखान्यापासून दहा किमी अंतरावर पोलिसांनी अडवला. राऊत यांनी गाडीतून उतरुन कारखान्यापर्यंत पायी जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत पोलिसांवर टीका केली.

संजय राऊत म्हणाले, मी कारखान्यात जाणार आहे. तेथे कारखान्याचे संस्थापक मधुकररावांना श्रद्धांजली वाहणार आहे. असे असताना मला कशासाठी अडवले जात आहे. कशासाठी येथे जमावबंदी आहे. येथे दंगल होणार आहे का, गृहमंत्री करत आहेत का. गृहमंत्री बदलण्याची वेळ आली आहे. पोलिसांविरोधात हक्कभंग आणणार आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत यांनी या कारखान्यातील घोटाळ्याप्रकरणी मंत्री दादा भुसे आणि आमदार राहुल कुल यांच्यावरही आरोप केला आहे. कारखान्याचा आॅडीट रिपोर्ट देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला आहे. आमची लढाई राहुल कूल यांच्याविरोधात नसून दौंडमधील भीमा-पाटस साखर कारखान्याचे चेअरमन आहेत, ज्यांनी 500 कोटींचा घोटाळा म्हणजेच ज्याला मनी लाँड्रिंग बोलतो. त्याच्या चौकशीची मागणी आमच्याकडून करण्यात आली आहे. बाकी कोण काय करतोय? याबाबत फडणवीस यांना पुराव्यासहित 10 पत्र पाठवले आहेत. भेटीची वेळ मागितली आहे. या राज्यात सहकार खात्यात जो भ्रष्टाचार सुरू आहे, त्याचे मला काही पुरावे द्यायचे आहेत. पण त्यांना वेळ नाहीये. कोणत्या नशेत हे सरकार फिरतय? मला माहित नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

ही शेतकऱ्यांची लढाई आहे. भीमा-पाटस साखर कारखान्याचे चेअरमन किंवा दादा भुसे यांच्यावर एफआयआर दाखल करून चौकशी करण्यात येणार नसेल तर महाराष्ट्रात ज्या-ज्या विरोधी पक्षातील लोकांवर तुम्ही अशा प्रकारचे खोटे एफआयआर करून, गुन्हे दाखल करून आर्थिक गुन्ह्यांच्या नावाखाली ज्या कारवाया केल्या, तुरूंगात टाकले. ते सगळे गुन्हे तुम्हाला मागे घ्यावे लागतील, असे आवाहन राऊत यांनी केले.

First Published on: April 26, 2023 6:18 PM
Exit mobile version