Coronavirus : वांद्रे गर्दी मागे नेमका कुणाचा हात? संभाषणाचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Coronavirus : वांद्रे गर्दी मागे नेमका कुणाचा हात? संभाषणाचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
राज्यासह देशात सध्या कोरोनाचे संकट असून, संपूर्ण देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मात्र, मंगळवारी वांद्रे स्टेशन परिसरात अचानक गर्दी झाली राज्यातील लॉकडाऊनचा पुरता फज्जा उडाला. दरम्यान या गर्दीनंतर आता एक एक व्हिडिओ समोर येऊ लागले असून, या व्हिडीओतून धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. नुकताच एक व्हिडिओ समोर आला असून, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर वांद्रे परिसरात झालेली गर्दी पूर्वनियोजित होता का? आणि जर पूर्व नियोजित असेल तर त्या गर्दीमागे नेमका हात कुणाचा असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

काय आहे या व्हिडीओमध्ये  

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दोन तरुण बोलत आहे. यामध्ये पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला विचारत आहे की  काही ठरलं की नाही, कोणी येतंय की नाही? त्यानंतर दुसरी व्यक्ती त्या व्यक्तीला म्हणत आहे मीडिया येणार आहेत आणि पोलिसही. याच वेळी पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला विचारते की चारची वेळ दिली मग आतापासूनच उभे राहिलात तुम्ही.. खूप लवकर उभे राहिलात. त्यावर दुसरी व्यक्ती पहिल्या व्यक्तीला म्हणते काय करणार यानंतर दुसरी व्यक्ती म्हणते आम्हाला जेवण नकोय गावाला जायचे आहे. यावर पहिली व्यक्ती म्हणत आहे, एवढंच बोला, सगळ्यांनी एकत्र बोला, याचं त्याचं ऐकू नका. फक्त सांगा आम्हाला गावाकडे जायचे आहे. एकंदरीत हे सर्व संभाषण ऐकले असता ही गर्दी पूर्व नियोजित तर नाही ना? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

विनय दुबेला अटक  

दरम्यान मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेर स्थलांतरित मजुरांच्या गर्दीप्रकरणी पोलिसांनी विनय दुबे नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. नवी मुंबई पोलिसांनी मंगळवारी (१५ एप्रिल) रात्री विनय दुबेला ऐरोलीतून ताब्यात घेतले आणि मुंबई पोलिसांकडे सुपूर्द केले. त्यानंतर त्याला रात्री उशिरा वांद्रे पोलिसांत हजर करण्यात आले. तिथे त्याला अटक करण्यात आली. लॉकडाऊनदरम्यान मजुरांची दिशाभूल करुन गर्दी जमवल्याचा आरोप विनय दुबेवर आहे. तर
आज बुधवारी उस्मानाबाद येथून एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे विशेष प्रतिनिधी राहुल कुलकर्णी याला अटक करण्यात आली आहे.
First Published on: April 15, 2020 3:49 PM
Exit mobile version