सत्ताधारी पक्षातील १२० नेत्यांची यादी ईडीकडे सोपवणार; संजय राऊतांचा इशारा

सत्ताधारी पक्षातील १२० नेत्यांची यादी ईडीकडे सोपवणार; संजय राऊतांचा इशारा

शिवसेना खासदार संजय राऊत

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडी छापा टाकल्यानंतर आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील पक्ष आक्रमक झाले आहेत. दरम्यान, बुधवारी शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केद्रातील सत्ताधारी पक्षाला ईडी कारवाईवरुन थेट धमकी वजा इशारा दिला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपण १२० नेत्यांची यादी ईडी आणि अर्थमंत्रालयाकडे सोपवणार आहे, मग बघूया ईडी कोणाकोणाला नोटीस पाठवते. प्रताप सरनाईक यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईबद्दल बोलताना संजय राऊत यांनी महाराष्ट्रात जे मुख्य लोक आहेत त्यांच्यावर दबाव आणून राजकारण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप केला आहे. आपल्याला अद्याप ईडीची कोणती नोटीस आली नसल्याचे राऊत यांनी सांगितले.

संजय राऊत यांनी ईडीला आवाहन देत केंद्रातील सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे. “या सगळ्या चौकशा पूर्ण होऊद्यात नंतर १२० नेत्यांची यादी मी ईडी आणि अर्थ मंत्रालयाकडे पाठवतो. या यादीत सत्ताधारी पक्षातील हे नेते आहेत. मग ईडी कोणाला नोटीस पाठवते हे पाहूयात,” असं संजय राऊत म्हणाले. पुढे राऊत यांनी ईडी नोटीसीवर भाष्य करताना, “मला अनेकांनी नोटीस आली का विचारले. मी वाट पाहतोय आणि आली तरी आश्चर्य वाटणार नाही. मला, अजित पवार किंवा अन्य कोणाला नोटीस आली तर धक्का बसणार नाही. २० वर्ष जुनी थडगी उकरण्याचे काम सुरु असल्याचं मला कळाले आहे. आम्हीदेखील तयार आहोत,” असे म्हणाले.

 

 

महाराष्ट्रात आमची सत्ता, चौकशीला कोण घाबरले हे लवकर कळेल

First Published on: November 25, 2020 12:24 PM
Exit mobile version