तशीच काळजी करमुसे यांच्याबद्दल दाखवणार का? किरीट सोमय्या यांची गृहमंत्र्यावर टीका

तशीच काळजी करमुसे यांच्याबद्दल दाखवणार का? किरीट सोमय्या यांची गृहमंत्र्यावर टीका

गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर स्पेनवरून परतलेली त्यांची मुलगी ही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा दावा एका वाहिनीच्या बातमीतून केल्या प्रकरणी आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आचारसंहितेची पायमल्ली या वृत्तवाहिनीने केल्याचे सांगत कारवाईचा इशारा दिला आहे. यावरून आता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर टीका केली असून, जी काळजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बद्दल दाखवली तशीच काळजी अनंत करमुसे यांच्याबद्दल दाखवणार का असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

काय म्हणालेत सोमय्या

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जितेंद्र आव्हाड बदलचे ट्विट पाहिले आणि कारवाई वाचली. मंत्र्याबद्दल आपली त्वरीत कारवाई पाहिली. कुठल्याही कोरोनाग्रस्त व्यक्तीची काळजी घ्यायलाच हवी. पण तशीच त्वरीत, काळजी आणि अँक्शन करमुसे परिवारबद्दल ही दाखविणार का असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. तसेच याच मंत्री महोदयांमुळे अनंत करमुसे आणि त्यांच्या परिवारावर जे अत्याचार झाले त्याचे काय? तसेच मंत्र्यांचे बॉडीगार्ड, पोलीस, यांनी करमुसे यांचे अपहरण करून त्यांना मारहाण केली. तसेच मंत्री महोदयांच्या सहकाऱ्यांना, कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे, संबंधित वर्तक नगर पोलीस स्टेशनचा सगळ्या पोलिसांची कोरोना टेस्ट सुरू आहे. अशावेळी करमुसे परिवाराला वर्तक नगर पोलीस स्टेशन समन्स पाठवून बोलावीत आहे. त्या करमुसे परिवाराची काळजी सोडा, त्यांना मारहाण, कोरोना लागण!!?? ह्याची आपण चौकशी केली का असा सवालच सोमय्या यांनी व्यक्त केला आहे.

काय आहे करमुसे प्रकरण

समाजमाध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी त्यांच्या समक्ष बेदम मारहाण केल्याचा आरोप करत अनंत करमुसे यांनी करत पोलिसात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात अनंत यांच्याविरोधातही पोस्ट टाकल्याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी वर्तकनगर पोलिसांनी अनंत यांच्या पत्नीला समजपत्र पाठवले होते. दरम्यान या प्रकरणी राष्ट्रवादीच्या पाच कार्यकर्त्यांना अटक करून या पाचही जणांना १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते.

First Published on: April 16, 2020 1:28 PM
Exit mobile version