केईएममध्ये १५० हून अधिक करोनाच्या चाचण्या

केईएममध्ये १५० हून अधिक करोनाच्या चाचण्या

केईएम रुग्णालय

करोनाच्या पार्श्वभूमीवर कस्तुरबानंतर पालिकेच्या केईएम हॉस्पिटलमध्येही नमुन्यांची चाचणी केली जात आहे. मुंबईतील‌ ही दुसरी लॅब असून यामुळे रुग्णांचा तपासणी प्रतीक्षा कालावधी कमी होण्यास मदत होणार आहे. गुरुवारपासून सुरु झालेल्या या केईएम लॅबमध्ये १५० हून अधिक चाचण्या करण्यात आल्या असल्याची माहिती केईएम हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली आहे.

करोना संशयितांची संख्या सतत वाढत आहे. त्यामुळे लॅबची गरज होतीच. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेत भारतातील नमुने तपासण्यास येत होते. मात्र त्याचवेळी कस्तुरबा रुग्णालयातील लॅबची मदत होत होती. आता कस्तुरबानंतर केईएम हॉस्पिटलमध्ये चाचण्या केल्या जात आहेत. त्यामूळे, कस्तुरबा हॉस्पिटलवरील भार हलका होण्यास मदत होत आहे. या कामासाठी ५० पेक्षा जास्त कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

स्वाबची तपासणी फक्त कस्तुरबा आणि केईएममध्येच

करोना चाचणीत महत्वाची असणारी घशाच्या स्वाबची तपासणी आता फक्त कस्तुरबा आणि केईएममध्ये केली जात आहे. बाकी पालिकेच्या नायर, सायन, कूपर आणि वांद्रे भाभा या हॉस्पिटलमध्ये लक्षणे असलेल्यांची चाचणी केली जाणार आहे. प्राथमिक तपासण्या करुन करोनाची लक्षणे आढळल्यास त्यांना कस्तुरबात पाठवले जाते. बाकी हॉस्पिटलमध्ये सुरु करण्यात आलेल्या फिवर ओपीडीत या रुग्णांची तपासणी केली जातेय.


हेही वाचा – Big Breaking: आज रात्री १२ वाजल्यापासून संपुर्ण देशात लॉकडाऊन – पंतप्रधान मोदी

करोना तपासणी अहवालासाठी आधी पुणे येथील लॅबवर‌ अवलंबून रहाव लागत होते . कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये लॅबही करोना तपासण्या करत होती. पण, केईएम‌ हॉस्पिटलमध्ये लॅब सुरु झाली आणि‌ मुंबईत धडकणाऱ्या करोना संशयितांच्या‌ चाचण्या तपासणीसाठी वेग आला. मंगळवारी रात्री पर्यंत केईएम‌ लॅब मध्ये‌ १५० हून अधिक करोना तपासण्या झाल्या असल्याची माहीती अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली. ज्यांचा काहीही प्रवास केल्याचा इतिहास नाही त्यांनी या हाॅस्पिटलमध्ये तपासणी आणि उपचार घेतले तरी चालणार आहे असं ही डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

 

First Published on: March 24, 2020 9:05 PM
Exit mobile version