Khichdi Scam मध्ये संजय राऊत यांच्यासह त्यांचे कुटुंबीय अडकणार?

Khichdi Scam मध्ये संजय राऊत यांच्यासह त्यांचे कुटुंबीय अडकणार?

मुंबई : खिचडी घोटाळ्या प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणीत वाढणार आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी राजीव साळुंखे यांच्या खात्यातून संजय राऊत यांचे निकटर्तीय सुजीत पाटकर यांच्या खात्यात जमा झाले असून त्यांच्या खात्यातून हे पैसे संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत आणि कन्या विधीता राऊत यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहेत.

कोविड काळात खिचडी घोटाळा गाजले होते. खिचडीचे कंत्राट मिळालेल्या सह्याद्री रिफरेशमेन्ट कंपनीचे राजीव सांळुखे यांच्या खात्यातून सुजीत पाटकर यांच्या खात्यात लाखोंचा निधी जमा झाल्याचे पुरावे पोलिसांना तपासात सापडले आहेत. या प्रकरणाचा संजय राऊतांचे बंधू संदीप राऊत आणि कन्या विधीता राऊतांशी संबंध येत आहे. यामुळे खिचडी घोटाळ्या प्रकरणी राऊत कुटुंबीयांच्या अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जाते.

हेही वाचा – आर्थिक गुन्हे शाखेने फास आवळला; खिचडी घोटाळ्यात संजय राऊतांचे बंधू अडचणीत

काय आहे खिचडी घोटाळा ?

मुंबई महानगरपालिकेचा 100 कोटींचा कोविड घोटाळा आता समोर आला आहे. गरिब मायग्रेन कामगारांसाठी, ज्यांचे स्वत:चे मुंबईत घर नाही त्यांना लॉकडाऊन काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. भारत सरकारचेही त्याला समर्थन होते. या मायग्रेन कामगारांना खिचडी देण्याचे कॉन्ट्रॅक्ट 52 कंपन्यांना मुंबई महानगरपालिकेने दिले होते. सुरुवातीच्या 4 महिन्यात 4 कोटी खिचडी पॅकेट वाटण्यात आले, असे मुंबई महानगरपालिकेचे म्हणणे आहे. यात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर त्यांची चौकशी सुरू आहे.

हेही वाचा – SC Vs HC: मुलींनी दोन मिनिटांच्या सुखासाठी…; कलकत्ता उच्च न्यायालयाच्या टिप्पणीवर सर्वोच्च न्यायालय संतापले

राऊतांना सुजीत पाटकरांनी खात्यातून दिली ‘एवढी’ रक्कम

पोलिसांच्या तपासानुसार, सुजीत पाटकर यांच्या खात्यातून 45 लाख रुपये संदीप राऊत यांच्या खात्यावर 7.75 लाख रुपये तर विधिता राऊत यांच्या खात्यात 14.75 लाख रुपये जमा झाले आहेत. कोविड काळात खिचडी बनवण्याचे कंत्राट बाळा कदम यांच्या मे वैष्णवी किचन (सह्याद्री रिफरेशमेन्ट) याला देण्यात आले. बाळा कदम हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत.

First Published on: December 8, 2023 5:18 PM
Exit mobile version