Winter Session: हिवाळी अधिवेशन केवळ पाच दिवसांचं; कालावधी वाढवण्याबाबत पुन्हा बैठक – फडणवीस

Winter Session: हिवाळी अधिवेशन केवळ पाच दिवसांचं; कालावधी वाढवण्याबाबत पुन्हा बैठक – फडणवीस

धनशक्ती सत्तेचा गैरवापर केला तरी भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष राहणार, फडणवीसांचा मविआवर हल्लाबोल

हिवाळी अधिवेशनाच्या संदर्भात कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना हिवाळी अधिवेशन केवळ पाच दिवसांचं असणार असून कालावधी वाढवण्याबाबत पुन्हा बैठक होणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या वेळी त्यांनी अधिवेशनाच्या कालावधीवरुन राज्य सरकारवर टीका केली.

नेहमीप्रमाणे अधिवेशन न घेण्याची जी काही या सरकारची आतापर्यंतची कार्यप्रणाली राहिली आहे, त्या प्रमाणेच अतिशय तोकडं चार-पाच दिवसांचं अधिवेशन घेण्यात आलं आहे, असी माहिती फडमवीस यांनी दिली. एकूण कामकाजाचे दिवस पाच आहेत. यातील पहिला दिवस शोक प्रस्तावामध्ये जातो, त्यामुळे चार दिवसांचं अधिवेशन आहे. मोठ्या प्रमाणात पुरवणी मागण्या येणार आहेत, त्यावर एक दिवस चर्चा आणि चर्चेनंतर त्या पास करायच्या असा निर्णय घेण्यात आला, असं फडणवीस यांनी सांगितलं.

अधिवेशनाचा कालावधी कमी का यावर उत्तर देताना राज्य सरकारने ३१ डिसेंबर आहे, लोकं बाहेर जातात असं उत्तर दिलं. त्यावर आम्ही त्यांना अशी विनंती केली तीन दिवस ब्रेक घेऊन पुन्हा अधिवेशन घेऊ शकता. जानेवारीमध्ये पाच-सहा दिवस हे अधिवेशन होऊ शकतं, असं आम्ही सांगितल्याचं फडणवीसम म्हणाले. अधिवेशन घेण्याची मानसिकता सरकारची दिसत नाही. प्रश्नांना सामोरे जाण्याची मानसिकता दिसत नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली. तसंच, शेवटी माझ्या फार आग्रहानंतर पुन्हा एकदा २३ तारीखला कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊन अधिवेशनाचा कालावधी वाढवता येईल का त्यावर आम्ही चर्चा करु, असं आश्वासीत केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

फडणवीसांची राज्य सरकारवर नाराजी

गेल्या दोन वर्षात साध्या अतारांकीत प्रश्नाला देखील उत्तर देण्यात आलेलं नाही. यामुळे राज्य सरकारकडे तिव्र नाराजी व्यक्त केली. विधानभवनाची गरिमा पूर्णपणे खाली चालली आहे. अतारांकीत प्रश्नाला उत्तर देण्यासाठी अधिवेशन लागत नाही. एकाही लक्ष्यवेधीला उत्तर देण्यात आलेलं नाही. सगळी आयुधं गोठवून टाकण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. यावर मला आश्वासीत केलं आहे की गुरुवारी बैठक घेऊन कुठल्याही परिस्थितीत या दोन वर्षातील प्रलंबित अतारांकित प्रश्नांची उत्तरं ही अधिवेशनापूर्वी देऊ, असी माहिती फडणवीस यांनी दिली.

मार्चमधील अधिवेशन नागपूरला घ्यावं

आमची प्रामुख्याने मागणी होती की अधिवेशन नागपूरला झालं पाहिजे. जवळजवळ दोन वर्ष नागपूरला अधिवेशन होत नाही आहे. विदर्भातील लोकांना असं वाटतंय की आपली फसवणूक होत आहे. जाणीवपूर्वक अधिवेशन त्या ठिकाणी घेतलं जात नाही आहे. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रुग्णालयात आहेत, त्यांना विमान प्रवास किंवा कुठलाही प्रवास या महिन्यात करता येणार नाही आहे, असं राज्य सरकारने सांगितलं. सरकारने विनंती केली म्हणून आम्ही त्यावर सकारात्मक दृष्टीकोन घेतला. मुख्यमंत्र्यांना येता येत नसेल तर ती देखील एक अडचण आहे. पण त्यावर आम्ही मागणी केली की कुठलाही परिस्थितीत मार्चमधील अधिवेशन नागपूरला घ्यावं. त्यावर सरकारने असं उत्तर दिलं करी, मुख्यमंत्र्यांसोबत बैठक करुन मार्चमधील अधिवेशन नागपूरला कसं घेता येईल यासंदर्भात निश्चित गांभिर्याने विचार करु असं आश्वासन दिलं आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

 

First Published on: November 29, 2021 12:12 PM
Exit mobile version