WMPL 2024 : महाराष्ट्र महिला प्रीमियर लीगची लिलाव प्रक्रिया पूर्ण, स्मृती मंधाना पुण्याची कर्णधार

WMPL 2024 : महाराष्ट्र महिला प्रीमियर लीगची लिलाव प्रक्रिया पूर्ण, स्मृती मंधाना पुण्याची कर्णधार

महाराष्ट्र महिला प्रीमियर लीगची लिलाव प्रक्रिया पूर्ण, स्मृती मंधाना पुण्याची कर्णधार

मुंबई : महाराष्ट्र क्रिकेट असोसिशनकडून आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या महिला प्रीमियर लीगसाठी लिलाव प्रक्रिया पार पडली. या प्रीमियर लीगमध्ये चार संघ सहभागी होणार असून या चारही संघांसाठी विक्रमी रुपयांची बोली लागली आहे. या चार संघांसाठी संघ मालकांकडून तब्बल 15.09 कोटी रुपये खर्च केले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, महिलांसाठी स्वतंत्र ट्वेन्टी-20 लीग आयोजित करणारी महाराष्ट्र क्रिकेट संघटना ही एकमेव राज्य संघटना आहे. (WMPL 2024 Maharashtra Women Premier League auction process complete)

जून महिन्यात 24 तारखेपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र महिला प्रीमियर लीगमध्ये एकूण 13 सामने खेळले जाणार आहेत. यामध्ये पुणे, नाशिक, सोलापूर आणि रायगड या चार संघांचा समावेश आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना ही देखील या प्रीमियर लीगमध्ये खेळणार असून ती पुण्यातून सहभागी होणार आहे. तसेच, ती पुणे संघाची कर्णधार असेल. एमपीएलमधील पुणेरी बाप्पा संघाच्या मालक असलेल्या सुहाना सह्याद्री सुजनिल्स चार एस समूहाने महिला प्रिमियर लीगमध्ये देखील पुणे संघासाठी सर्वाधिक 5.1 कोटी रुपयाची बोली लावली आहे.

त्याशिवाय, वाई एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेडने नाशिक संघासाठी 3.8 कोटी रुपयाची दुसरी सर्वोत्तम बोली लावली. या संघामघून भारताची आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. तर, कपिल सन्स समुहाने यावेळी रत्नागिरी संघासाठी 3.6 कोटी रुपयांची बोली लावली. कंपनीने पुढे वेगळ्या शहराचा आणि जिल्ह्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांनी रायगडसोबत जाण्याचा निर्णय घेतला. याआधी या समुहाकडे सोलापूर संघाची मालकी होती. पण आता नव्या संघाचे नाव रायगड रॉयल्स असे असेल. या संघाकडे आंतरराष्ट्रीय खेळाडू किरण नवगिरे या आयकॉन खेळाडू म्हणून असतील. रॉयल जिनियस स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने 3.4 कोटी रुपयांमध्ये सोलापूर संघाची मालकी विकत घेतली असून त्यांनी देविका वैद्यला आयकॉन खेळाडू म्हणून निवडले आहे.

हेही वाचा… CSK vs SRH 2024 : धोनीमुळे चेन्नईच्या चाहत्याने प्रेयसीशी केला ब्रेकअप, पोस्टर व्हायरल

एमसीएकडून महाराष्ट्र वुमन्स प्रीमियर लीगचे आयोजित करण्यात येत असून एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. या लीगसाठी झालेल्या लिलावाच्या कार्यक्रमाला रोहित पवार उपस्थित राहू शकले नाही. पण त्यांनी आपला संदेश पाठवला होता, जो एमसीएचे सचिव कलमेश पिसाळ यांनी वाचून दाखवला. या लीगबाबत रोहित पवार म्हणाले की, मला अभिमान आहे की एमसीए या नात्याने आम्हाला फ्रँचाईजी आधारीत महिला टी-20 लीगचे आयोजन करणारी पहिली संघटना म्हणून संधी मिळाली. गेल्या वर्षी एमपीएल खेळाडूंच्या लिलावात आम्ही महिला प्रिमियर लीगचे आयोजन करण्याचे वचन दिले होते. आम्ही आमचा शब्द पाळला आहे.

तसेच, एमपीएलने आमच्या खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. मला खात्री आहे की महिला प्रिमियर लीग देखील आमच्या महिला क्रिकेटपटूंसाठी असेच व्यासपीठ बनेल. मला विश्वास आहे की महिला प्रीमियर लीगमधून भविष्यातील भारतीय खेळाडू उदयास येतील, असे रोहित पवार यांच्याकडून सांगण्यात आले.

हेही वाचा… IPL 2024: हैदराबादला हरवून चेन्नईची पॉइंट टेबलमध्ये मोठी झेप; ऑरेंज कॅपच्याजवळ गायकवाड


Edited By : Poonam Khadtale

First Published on: April 29, 2024 9:44 PM
Exit mobile version