वर्क फ्रॉम होममुळे वीज बिल वाढलं – उर्जामंत्री नितीन राऊत

वर्क फ्रॉम होममुळे वीज बिल वाढलं – उर्जामंत्री नितीन राऊत

वर्क फ्रॉम होममुळे बील वाढलं असा खुलासा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला. वीजेचे वाढीव बिल पाठवलेलं नाही, असं स्पष्टीकरण उर्जांमत्र्यांनी दिलं आहे. वीज बिलाबाबत ग्राहकांच्या तक्रारींचं निराकरण करु, असं उर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. लॉकडाऊनमुळे वीजेची मागणी वाढली असल्याचं नितीन राऊत म्हणाले. ते पत्रकार परिषद बोलत होते.

सध्या वीज बिल जास्त आल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. यावर उर्जामंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी स्पष्टीकरण देताना म्हणाले, नागरिक घरातच असल्यानं विजेचा वापर वाढला. वर्क फ्रॉम होममुळे बील वाढलं. वीज बिलाबाबत ग्राहकांच्या तक्रारींचं निराकरण करु, असंही नितीन राऊत म्हणाले. घरगुती वीज बिल भरण्यासाठी ३ आठवड्यांची मुभा देण्यात आली आहे. वाढीव वीजबिलांची घरबसल्या पडताळणी करण्यासाठी महावितरणने https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ ही लिंक दिलेली आहे. तुम्ही महावितरणच्या कार्यालयातही जाऊन वीजबिलांची आकारणी समजून घेऊ शकता, असं ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं आहे. तसंच ग्राहकांना मीटर रिडींग चुकल्याने किंवा अन्य कारणाने चुकीचं वीजबिल गेलं असल्यास ते दुरुस्त करण्यात येईल. काही ठिकाणी चुका घडल्याही असतील, पण ते प्रमाण अल्प आहे आणि त्यात सुधारणा करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत,” असंही उर्जामंत्री म्हणाले.


हेही वाचा – तुकाराम मुंढेंच्या कामाविरोधात गडकरींची थेट पीएमोला तक्रार


जून २०२० चं बिल तीन आठवड्यांमध्ये भरण्याची घरगुती ग्राहकांना मुदत देण्यात आली आहे. एकूण बिलाची कमीत कमी एक तृतीयांश रक्कम भरल्यास तुमचं मीटर कनेक्शन कापलं जाणार नाही. शिवाय, तुम्ही संपूर्ण बिल भरलं तर दोन टक्क्यांची सूट दिली जाणार असल्याचं उर्जामंत्र्यांनी सांगितलं. जर तुम्ही याआधीच संपूर्ण बिल भरलं असेल तर त्यांनाही हा लाभ मिळणार आहे. यासह, जे लॉकडाऊनमध्ये घरी गेले होते आणि वीजवापर एकदमच कमी असतानासुद्धा त्यांना रीडिंग घेता न आल्यामुळे सरासरी बिल आलं असेल, त्यांची बिलं दुरुस्ती करून देण्यात येतील, असंही नितीन राऊत यांनी सांगितलं. या सर्व उपाययोजनांचा वापर करूनसुद्धा जर लोकांचं समाधान झालं नाही तर ग्राहक मला स्वतःहून संपर्क करू शकतात, असं सांगत नितीन राऊतांनी स्वतःचा ईमेल आयडी आणि फोन नंबर दिला. energyminister@mahadiscom.in+91-9833717777 | +91 9833567777

First Published on: June 30, 2020 5:14 PM
Exit mobile version