पुणे : धक्कादायक! एकाच दिवसात २९१ नवे रुग्ण, १४ जणांचा मृत्यू

पुणे : धक्कादायक! एकाच दिवसात २९१ नवे रुग्ण, १४ जणांचा मृत्यू

देशात कोरोना विषाणूने अक्षरश: कहर केला आहे. तर सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळले असून मुंबई आणि पुण्याला सर्वात जास्त फटका बसला आहे. तर चिंतेची बाब म्हणजे पुण्यात आज एका दिवसात सर्वाधिक २९१ रुग्ण आढळून आले आहेत. तर १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

पुणे शहरात आज दिवसभरात २९१ रुग्ण आढळले आहेत. तर आजपर्यंतची एकाच दिवसात आढळलेली ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. यामुळे पुणे शहरातील एकूण रुग्णसंख्या ४ हजार ३९८ इतकी झाली आहे. तर आज दिवसभरात १४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच उपचार घेत असलेल्या रुग्णांची चाचणी केली असता १८९ जणांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेरपर्यंत २ हजार ३७१ रुग्ण करोनामुक्त झाल्याचे आरोग्य मार्फत सांगण्यात आले आहे.

राज्यात २९४० कोरोना रुग्णांची नोंद

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असून काल सापडलेल्या २३०० रुग्णांवरून आज दिवसभरात राज्यात २९४० नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातल्या रुग्णांचा एकूण आकडा ४४ हजार ५८२ झाला आहे. याशिवाय आज राज्यात ६३ कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा दीड हजारांच्या पार जात १५१७ इतका झाला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचा फैलाव अजूनही नियंत्रणात येत नसल्याचं हे चित्र असून लॉकडाऊन उठवल्यानंतर यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, २४ तासांत राज्यात ८५७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आता कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचा आकडा १२ हजार ५८३ झाला आहे.


हेही वाचा – 22 वर्षीय महिलेसह सहा वर्षाच्या बालिकेला कोरोनाची लागण


 

First Published on: May 22, 2020 11:37 PM
Exit mobile version