बेळगावात मराठीची गळचेपी, मराठी भाषेत स्टेटस ठेवलं, तीन जणांना अटक

बेळगावात मराठीची गळचेपी, मराठी भाषेत स्टेटस ठेवलं, तीन जणांना अटक

व्हॉट्सअॅप स्टेटस मराठी भाषेत ठेवल्याने बेळगावमध्ये तीन मराठी मुलांना अटक करण्यात आली आहे. कर्नाटक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यामुळे मराठी भाषिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेमुळे मराठी व कन्नडीगांमध्ये नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिगंबर डेळेकर, निखिल केसरकर आणि विशाल छप्रे अशी अटक करण्यात आलेल्या मुलांची नावं आहेत.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तणावाचे वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या रुग्णवाहिकेवर कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. रुग्णवाहीकेला काळे फासण्याचाही प्रयत्न केला. विशेष म्हणजे ही घटना जेव्हा घडली तेव्हा तेथे पोलिसही उपस्थित होते. मात्र पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कन्नड संघटनेच्या कार्यकर्तं्यायाना हुसकावून लावले. पण त्यानंतर हा वाद अधिकच चिघळला. आज सकाळी कोल्हापूर मध्यवर्ती बस डेपोत उभ्या असलेल्या एसटीवर कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यंानी हल्ला केला व तोडफोड केली. याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत.

त्यानंतर आता व्हॉट्सअॅप स्टेटस मराठीत ठेवल्याने तीन मराठी मुलांना अटक करण्यात आली आहे. यामुळे येथील मराठी भाषिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

First Published on: March 13, 2021 6:21 PM
Exit mobile version