Pre-Wedding : प्री वेडिंगसाठी आउटफिट शोधताय? ‘हे’ ड्रेस करा ट्राय

Pre-Wedding : प्री वेडिंगसाठी आउटफिट शोधताय? ‘हे’ ड्रेस करा ट्राय

गेल्या काही वर्षांपासून लग्नाआधी प्री-वेडिंग फोटोशूटस्‌कडे जोडप्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचाही कल वाढलेला दिसून येत आहे. परंतु अनेदा शूट दरम्यान आपण कोणत्या प्रकारचे आउटफिट घालावेत याची चिंता अनेक वेळा महिलांना असते.
लग्नाआधी केल्या जाणाऱ्या फोटोशूटच्या ड्रेसबाबत महिला अनेकदा गोंधळलेल्या असतात. म्हणूनच आम्ही काही ड्रेस ऑप्शन्स घेऊन आलो आहोत ज्यामध्ये तुम्ही खूप सुंदर दिसाल.

शॉर्ट ड्रेस

प्री-वेडिंग शूटसाठी तुम्ही शॉर्ट ड्रेस निवडू शकता. या प्रकारच्या ड्रेससह, तुम्ही तुमच्या केसांना सरळ किंवा लहरी केसांची स्टाईल करू शकता. हाय हिल्स, बेसिक मेकअप लूक पूर्ण करा.

साडी

प्री वेडिंग फोटोशूट दरम्यान जर तुम्हाला एथनिक ड्रेस घालायचा असेल तर तुम्ही साडी घालू शकता. यासाठी केसांना उंच अंबाड्यात बांधा किंवा उघडे ठेवा. तुम्ही सॅटिनची साडीही निवडू शकता.

गाऊन

गाऊन सध्या ट्रेंडमध्ये आहे. यासाठी केसांना कर्ल हेअर स्टाइल देऊ शकता. स्मोकी आय मेकअप करा. चोकर नेकलेस, बांगड्या आणि मांगे टिक्कासह लूक पूर्ण करू शकतात.

अनारकली ड्रेस

अनारकली सूट सध्या अनेक ठिकाणी प्री-वेडिंग शूटसाठी आवर्जून वापरला जाणारा आउटफिट आहे. विविध प्रकारे शुटींग करण्यासाठी अनारकली ड्रेस उत्तम समजला जातो. फक्त उंची कमी असल्यास, अनारकली ड्रेसवर शूट करणे टाळावे, अनारकली ड्रेस हा लांब असल्याने कमी उंची असलेला व्यक्ती त्यात अजूनच लहान दिसू शकतो.

कॅज्युअल ड्रेस

 

तुम्ही कॅज्युअल ड्रेसही घालू शकता. डेनिम जीन्ससोबत तुम्ही काळा शर्ट किंवा पांढरा टी-शर्ट कॅरी करू शकता. या प्रकारच्या लुकमध्ये तुम्ही फंकी फोटोशूट करू शकता.

____________________________________________________

हेही वाचा : ऑफिससाठी फूटवेअर स्टायलिंग टिप्स

First Published on: March 7, 2024 2:20 PM
Exit mobile version