Summer Fashion : उन्हाळ्यात डेनिम वापरण्याची फॅशन

Summer Fashion : उन्हाळ्यात डेनिम वापरण्याची फॅशन

उन्हाळ्याच्या दिवसात नक्की काय कपडे घालावे हा प्रश्न नेहमीच पडतो. रोज रोज कॉटनचे ड्रेस घालणंही शक्य नसतं. आणि तेवढे कॉटनचे कपडेही कपाटात नसतात. अशावेळी वर्षभर साथ देणारी डेनिम कितीही त्रास झाला तरी हवीहवीशी वाटते. डेनिमसारखं दिसणारं हे कापड उन्हाळ्यातील नवीन डेनिम आहे किंवा डेनिमला बेस्ट ऑप्शन आहे असं नक्कीच म्हणता येईल. उन्हाळ्यातही तुम्ही डेनिम जीन्स, शर्ट परिधान करुन स्टायलिश लुक करुन कंफर्टेबल राहू शकता. यासाठी नव्या डेनिम अवताराचे कूल ऑप्शन्स आले आहेत. ते पाहुयात.

डेनिम शॉर्ट्स

उन्हाळ्यात तुम्ही जीन्सऐवजी डेनिम शॉर्ट्स घालू शकता. यामुळे तुम्हाला मस्त लुक मिळेल. याच्या मदतीने तुम्ही क्रॉप टॉप किंवा शर्ट विविध स्टाइल करून घालून शकता. डेनिम शॉर्ट्स अत्यंत कॅज्युअल असे आऊटफिट असून, प्रत्येक मुलीच्या वॉर्डरोबमध्ये नक्कीच डेनिम शॉर्ट्स असायला हवे. डेनिम शॉर्ट्स नेहमी वेगवेगळ्या स्टाईलमध्येही घालता येते. त्यामुळे प्रत्येकवेळी नवा लुक मिळतो.

डेड डेनिम / रिप्ड

रोजच्या वापरातील पायाला घट्ट चिकटून बसणारी जीन्स उन्हाळ्यात नकोच असते. पण आपण बाराही महिने ही जीन्स वापरतोच. त्यामुळे उन्हाळ्यातही कितीही त्रास झाला तरी बरीच लोक जीन्स घालतात. हेच हेरून ‘डेड डेनिम’ किंवा रिप्ड – लाईट डेनिम जीन्स बाजारात आल्या आहेत. लेग फ्रेंडली अशा या जीन्स तुम्हाला कडक उन्हळ्यातही वापरता येतील. या जीन्स लूझ फिट असणाऱ्या, वॉशिंगसाठी सोप्या असणाऱ्या आणि महत्वाचं म्हणजे सहज घालता आणि काढता येणाऱ्या अशा आहेत.

डेनिम शर्ट

डेनिम म्हटलं की जीन्ससारखं शर्ट हा आलाच. लुझमध्ये मुलं आणि मुली अशा दोघांच्या फॅशनमध्ये हा डेनिम शर्ट मस्ट असतो. नव्वदच्या दशकातील रेट्रो फॅशनची आठवण करून देणारा हा डेनिम्स शर्ट टेपर्ड ब्लॅक जेगिन्स आणि क्लासिक कॅज्युअल ट्रेनर्ससोबत घालू शकता.

डंग्री

डंग्रीचा वापर तुम्ही सुट्टीमध्ये फिरायला जाताना नक्कीच करू शकता. तुम्ही तुमच्या कम्फर्टप्रमाणे कोणत्याही फिटेड टॉप किंवा आता जास्त ट्रेडिंग असणारा क्रॅप टॉप डेनिम डंग्री सोबत घालू शकता.

डेनिम जॅकेट्स

आपण कितीही कोणत्याही प्रकारचे जॅकेट्स वापरले तरी डेनिम जॅकेट्सला तोड नाही. फॅशन डिझाइनरने स्पेशल डेनिम जॅकेट्स बाजारात आणले आहेत. हे इझी टू वेअर आणि सॉफ्ट, हलके जॅकेट्स तुम्ही प्लेन टॉप आणि जीन्ससोबत घालू शकता.

First Published on: March 15, 2024 1:22 PM
Exit mobile version