‘जीन्स पुरानी, फॅशन नया’, तुमच्या जीन्सला द्या नवा लूक

‘जीन्स पुरानी, फॅशन नया’, तुमच्या जीन्सला द्या नवा लूक

जीन्सचे कापड काही केल्याने खराब होत नाही. मग तिचा कंटाळा येऊ लागतो. पण जर तुम्हाला तुमच्या जीन्सला नवीन लूक द्यायचा असेल तर तुम्ही त्या जीन्सचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करु शकता. फॅशन सतत बदलत असते त्यामुळे सध्या सुरु असणाऱ्या ट्रेंडमध्ये तुम्ही तुमच्या जुन्या जीन्सला नवा लूक देऊ शकता. जर तुमच्या जीन्सचा रंग फिका पडला असेल, पण त्याचे फिटिंग आणि फॅब्रिक अजूनही ठीक असेल, तर तुम्ही काही बदल करून ते पुन्हा घालू शकता. आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या जुन्या जीन्सला नवीन बनवू शकता.

जिन्सवर लावा स्टिकर

बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे स्किकर मिळतात. या स्टिकरचा वापर करुन आपण जीन्सला वेगळा लूक देऊ शकतो. यामुळे तुमची जीन्स इतरांपेक्षा वेगळी वाटेल. फंकी लुक तयार करण्यासोबतच ते खूप ट्रेंडीही दिसेल

शॉर्ट्स तयार करा

अनेक वेळा जीन्स वापरुन तीच कंटाळा येतो. त्याच प्रमाणे जीन्सचे गुडघे मोठे आणि लोंबकळलेले वाटू लागतात. अशा जीन्सच्या तुम्ही शॉर्ट्स तयार करु शकता. त्यासाठी योग्य माप घेऊनच शॉर्ट्स तयार करा अन्यथा ते छोटे होण्याची शक्यता असतो.

दुसरे प्रिंटेड कापड जोडा

जर तुमची जीन्स खूप जुनी दिसत असेल, तर तुम्ही त्यावर दुसरे प्रिंटेड कापड जोडून नवीन लुक देऊ शकता. फुलांचा फॅब्रिक जीन्सच्या पुढच्या आणि मागे लांबीच्या दिशेने शिवून घ्या. हे तुमच्या जीन्सला नवीन आणि अनोखा लुक देऊ शकते

रिबिन्सचा वापर

तुमच्या जुन्या जिन्सच्या दोन्ही बाजूला तुम्ही रिबिन्स लावू शकता. यामुळे तुमच्या जिन्सला नवीन लूक मिळू शकेल. सध्याचा हा नवा ट्रेंड आहे. त्यामुळे तुम्हाला नवीन ट्रेंडी लूक मिळू शकेल.

First Published on: March 7, 2024 3:43 PM
Exit mobile version