Friday, May 17, 2024
घरमानिनीFashionवेलवेटच्या कपड्यांची अशाप्रकारे घ्या काळजी

वेलवेटच्या कपड्यांची अशाप्रकारे घ्या काळजी

Subscribe

सगळ्या कपड्यामध्ये वेलवेट हे असे कापड आहे जे आपल्या प्रत्येकावर छान उठून दिसतात. तसेच वेलवेटमध्ये अनेक प्रकार असतात. वेलवेटचा कपडा हा सगळ्या हवामानात चालत नाही. अशातच कोणत्याही कार्यक्रमात वेलवेट कपडे घालणे हे सोप्पे काम आहे. पण वेलवेट कपड्याला धुताना खुप काळजी घ्यावी लागते. वेलवेट कपड्यामुळे एक लूक मिळतो ज्यामुळे तुम्ही जास्त आकर्षक दिसतात. याबरोबरच हे कपडे धुताना विशेष काळजी घ्यावी लागते. बहुतेक लोक घरातच वेलवेटचे कपडे धुतात ज्यामुळे ते पटकन खराब होतात. तसेच वेलवेटचे कपडे काही काळानंतर खराब होतात.

How To Wash A Velvet Dress – Fashion Wanderer

- Advertisement -

वेलवेटचे कपडे खरेदी करताना या टिप्स वापरा

  1. लेबल टॅग वाचून घ्या

वेलवेटचे कपडे खरेदी करताना त्या कपड्याच्या टॅगवर काय काय आणि कोणती माहिती आहे ती आधी वाचून घ्या. तसेच हे लेबल वाचून तुम्हाला समजेल कि वेलवेटचे कापड किती काळ टिकणार आहे. यावरून तुम्हाला समजेल कापड कसे आहे आणि हे कापड धुताना कोणती काळजी घ्यावी लागणार आहे. हे लगेच समजून येईल.

2. अशा प्रकारे वेलवेटच्या कपड्यांवरचे डाग साफ करा

- Advertisement -

मखमली फॅब्रिक नाजूक असल्याने, ते प्रत्येक वेळी धुतल्याने ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. अशा पर स्थितीत स्पॉट क्लीनिंगच्या मदतीने तुम्ही तुमचे कपडे अगदी स्वच्छ ठेवू शकता. तसेच वेलवेट कपड्यांवर डाग असल्यास ते जास्त चोळू नका. त्याऐवजी, स्वच्छ, कोरड्या कपड्याने ते डाग हळूवारपणे पुसून टाका. जर डाग जात नसेल तरच तुम्ही हे कपडे बाहेर लॉंड्रीमध्ये धुवायला द्या.

3. वेलवेट कपडे सारखे घालू नका

वेलवेट कपडे हे अंगावर चांगले वाटतात. म्हणून ते आपल्याला पुन्हा पुन्हा घालावेसे वाटतात. पण हे कपडे सारखे घालू नये. कारण या कपड्यामुळे तुमच्या शरीराला जळजळ किंवा ऍलर्जी होऊ शकते. तसेच कॅज्युल लूकसाठी वेलवेट आऊटफिट्स नाही चांगले वाटत. तुम्हाला बाहेर फिरायला जायचे असेल किंवा खूपच स्पेशल कार्यक्रम असेल तरच वेलवेट कपडे घाला. अन्यथा हे कपडे घालायचे टाळा.

4. इस्त्री टाळा

साधारणपणे, आपण कपडे सुकल्यानंतरच इस्त्री करतो. पण वेलवेटचे कपडे धुतल्यानंतर इस्त्री करू नये. कारण इस्त्रीच्या उष्णतेमुळे वेलवेटच्या फॅब्रिकचे नुकसान होऊ शकते. इतकेच नाही तर वेलवेटच्या कपड्यांवर इस्त्रीचे लोखंडी डाग देखील लगेच दिसून येतात. त्यामुळे वेलवेटच्या कपड्यांना इस्त्री करू नका. फक्त हाताच्या मदतीने त्या कपड्यांना सरळ करा.

5. व्यवस्थित ब्रश करा

वेलवेटच्या कपड्यांमध्ये केस किंवा इतर अनेक गोष्टी चिटकून बसतात. आणि हे सगळं काढण्यासाठी मऊ ब्रिस्टल ब्रश वापरण्याचा सल्ला दिला जातो. पण हा ब्रश योग्यरित्या वापरणे देखील खूप महत्वाचे आहे. महत्वाचे म्हणजे वेलवेटचे कपडे कधीही जास्त ब्रश करू नका. याशिवाय, हे देखील लक्षात ठेवा की तुम्ही ब्रशचा वापर केसांच्या दिशेनेच करा, जेणेकरून कपड्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही.


हेही वाचा : थंडीत अशा प्रकारे घ्या उबदार कपड्यांची काळजी

- Advertisment -

Manini