Summer Fashion : उन्हाळ्यात ट्राय करा फ्लोरल प्रिंटचे ड्रेस

Summer Fashion : उन्हाळ्यात ट्राय करा फ्लोरल प्रिंटचे ड्रेस

प्लेन, शिफॉन, चिकनकरी वर्कच्या ट्रेंडनंतर आता मार्केटमधये एका प्रिंटने धुमाकुळ घातलाय. तो म्हणजे फ्लोरल प्रिंट ड्रेस. सध्या ट्रेंडींग असलेल्या फ्लोरल कुर्ती, ड्रेस हे उन्हाळ्यातही आरामदायक आहेत. जे स्टायलिश असतात. हवामान बदलले की त्यानुसार कपड्यांचे ट्रेंडही बदलतात. आम्ही तुम्हाला अशा प्रिंटबद्दल सांगणार आहोत, जे उन्हाळ्यात खूप सुंदर दिसते. फ्लोरल प्रिंट आउटफिट्सही खूप स्वस्त आहेत. ते विकत घेण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याचीही गरज भासणार नाही.

 

फ्लोरल पॅटर्न साडी

जान्हवी कपूर तिच्या स्टाइलमुळे चर्चेत असते. अशावेळी तुम्ही तिच्या लूकवरून टिप्स घेऊ शकता. अशा फ्लोरल प्रिंटच्या साडीमध्ये केस मोकळे ठेवावेत. यामुळे तुमचा लूक खूपच क्यूट दिसेल.

फ्लोरल प्रिंट सिंपल शरारा

शरारा सूटही सध्या ट्रेंडमध्ये आहे. अशावेळी तुम्ही बाजारातून फ्लोरल प्रिंट शराराही खरेदी करू शकता. उन्हाळ्यासाठी हा एक सुंदर आणि हलका सॉफ्ट सूट आहे. यामुळे तुमचा लूकही सुंदर दिसेल.

फ्लोरल ड्रेस

दिवसभराच्या पार्टीत स्टायलिश दिसायचे असेल, तर असा फ्लोरल प्रिंट ड्रेस हा उत्तम पर्याय आहे. यासोबतच हेअर स्टाइलची विशेष काळजी घ्या.

फ्लोरल स्लिट ड्रेस

उन्हाळ्यात फ्लोरल स्लिट ड्रेस नक्की ट्राय करा. आउटिंगला जात असाल तर असा फ्लोरल प्रिंट स्लिट ड्रेस तुमच्यासाठी योग्य आहे. तो दिसायला खूप स्टायलिश दिसतो.

फ्लोरल प्रिंट कुर्ता

मॉडर्न आणि स्टायलिश लुकसाठी हा परफेक्ट कुर्ता आहे. हा Front-Slit long dress आहे. जीन्स आणि हाय हिल्ससोबत हा कुर्ता परफेक्ट दिसेल. वापरायला अतिशय आरामदायी आहे. फॅशन आणि कम्फर्ट यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे.

First Published on: March 26, 2024 3:13 PM
Exit mobile version